Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खा. अशोक नेते यांच्या प्रयत्नाने देवरी तालुक्याला मिळाले ३ ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन

केंद्रीय मंत्री मा नितीनजी गडकरी यांच्याकडून मशीनचा पुरवठा. आमगावसाठी १ ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली :  गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खा. अशोक नेते यांनी आमगाव विधानसभा क्षेत्राचा दौरा करून आमगाव, देवरी व सालेकसा तालुक्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला असता या तालुक्यामध्ये ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर चा तुटवडा असल्याचे निर्दशनास आले. यावेळी खा. अशोक नेते यांनी साहीत्य उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. व त्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन देण्याची मागणी केली होती.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता नितीनजी गडकरी यांनी लोकसभा क्षेत्रासाठी २० ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले. खा. अशोक नेते यांनी त्यापैकी ३ मशीन देवरी व १ मशीन आमगाव तालुक्याला दिली व याचा चांगला उपयोग करून गरजू नागरिकांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याचे निर्देश खा. अशोक नेते यांनी दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी खा. अशोक नेते यांनी ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे सुपुर्द केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते झामसिंगजी येरणे, ज्येष्ठ नेते संतोषजी तिवारी, तालुका अध्यक्ष अनिलजी येरणे, ज्येष्ठ नेते बंटीजी भाटिया, तालुका महामंत्री प्रवीण दहीकर, तालुका महामंत्री विनोद भांडारकर, अल्पसंख्याक मोर्चा चे इमरान खान, युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य हितेश डोंगरे, देवरीचे उपविभागीय अधिकारी चंद्रमनी मोडक, तहसीलदार विजय बोरुडे, प्रकल्प अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलीस निरीक्षक, बीडीओ, नगर पंचायतचे मुख्याधिकारी व अन्य विभागाचे प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

 

हे देखील वाचा : 

दोन जहाल नक्षलवाद्यांना ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे भोवले, करावा लागला पदाचा त्याग

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

Comments are closed.