Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली आज 11 नवीन कोरोना बाधित तर 2 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 17 फेब्रुवारी:- आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आला. तसेच आज 2 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9427 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9284 वर पोहचली. तसेच सद्या 38 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.40 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.


नवीन 11 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 9 जणाचा समावेश आहे. तर भामरागड तालुक्यातील 2 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 2 रूग्णांमध्ये गडचिरोली 1, चामोर्शी 1, जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ-192, 1, सोनापूर कॉम्प्लेक्स 2, राणीदुर्गावती विद्यालय 2, कोटगल 1, मधुरानगर 1, जिल्हा परिषद शाळा 2, भामरागड तालुक्यातील बाधितांमध्ये एलबीपी हेमलकसा 2 बाधिताचा समावेश आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.