नागपूरात सुनेला ४ थ्या मजल्यावरुन सास-याने ढकलले
२६ वर्षीय करिष्मा संगणक अभियंता कायमची जायबंद:४ थ्या मजल्यावरुन सास-याने ढकलले
लग्नाला फक्त ३ महीनेच झाले असताना २० लाखांच्या हुंड्याच्या लोभापायी केल्याचे सागण्यात येत आहे
घटना २३ डिसेंबरला पंचनामा गणतंत्र दिनी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर,30 जानेवारी:– २६ वर्षीय करिष्मा कन्या लग्नाला फक्त ३ महीनेच झाले असताना २० लाखांच्या हुंड्याच्या लोभापायी आंबेडकरी कुटुंबियांद्वारेच इतकी छळल्या गेली की, तिच्या सास-याने चक्क तिला स्वयंपाक खाेलीच्या चाैथ्या माळ्यावरुन खाली ढकलून दिली!
काहीच महीन्यांपूर्वी आपल्या आईच्या अंगणात हसत खेळत बागडणारी ही संगणक अभियंता मूलगी आज आपल्याच आईच्या घरी एका खोलीत…पाठीचे स्पायनल कॉड्स मोडल्यामुळे कायमची जायंबद होऊन वेदनेने विव्हळत पडली आहे…!तिच्या आईचे अश्रू अविरत वाहत असून सासरे भीमराव तामगाडगे यांच्या या कृत्यावर काळजातून श्राप देत आहेत.
पिंपरी-चिंचवड येथील ऐका साॅफ्टवेअर कंपनीचे साॅफ्टवेअर अभियंता असणा-या साकेत भीमराव तामगाडगे यांचे स्थळ करिष्मा ऐन करोनाच्या काळात २५ लाेकांच्या उपस्थित मात्र तरीही अतिशय थाटामाटात आपल्या लाडक्या लेकीचे त्यांनी लग्न लावले.जवळपास साढे चार लाख रुपये खर्च केल्याचे त्या सांगतात मात्र आपल्या लेकीच सुखी संसार आता डोळ्यांनी पाहता येणार अशी आशा उराशी बाळगणा-या या मातेचे काळीचच तामगाडके या हुंड्याच्या लोभी दाम्प्तयाने उधवस्त नाही केले तर…या मातेच्या गर्भाचेच अस्तित्वच जणू खुरडून काढले..ऐवढे क्रोर्य ऐन २६ वीत त्या नवपरिणितेच्या वाट्याला लोभी सासरे भीमराव तामगाडके यांच्या लोभामुळे आले.
२३ डिसेंबरला सकाळी दहा पासूनच करिष्मा हीची नणद प्राची वासनिक व तिचे यजमान जे पूर्वी एचडीएफसी लाईफ येथे कार्यरत तर नागपूरातच टाटामध्ये सध्या विद्यमान नोकरी करणारे राहूल वासनिक यांनी करिष्माचा मानसिक छळ सुरु केला,असे करिष्माने हुडकेश्वर येथील पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नाेंदवले आहे.राहूल वासनिक हे देखील उच्च शिक्ष्ि त असून मॅनेजरपदावर आहेत. करिष्मा यांच्या आईने लग्नात फक्त सोन्याचा गोफ आणि आंगठी दिली, २० लाखांची कार दिली नाही, एफडी करुन दिली नाही इ.अश्या शब्दात तिला सासू ललिता भीमराव तामगाडगे,नणद प्राची व सासरे भीमराव टोमणे मारु लागले. नव-याच्या आठवणीने करिष्माला रडू कोसळले ती स्वत:च्या खोलीत बसून रडू लागली. मात्र तिथे ही तामगाडगे कुटुंबियांनी तिचा जबरदस्त छळवाद मांडला. सायंकाळी ४ वा. नणद प्राची वासनिक हीने चहा करुन आणला मात्र करिष्माने चहा घेण्यास ठामपणे नकार दिला. करिष्मा स्वयंपाक खोलीत आली तिच्या मागे सासरे भीमराव देखील आले व तिला चहा पिण्यास बाध्य करु लागले, ती गॅलरीत येतात सासरे भीमराव यांनी तिला….खाली ढकलू दिले…..!ती जीवाच्या आंकातांने किंचाळली…सिमेंटच्या जमीनीवर कोसळली.
रुग्णालयाने तिच्या सीटी स्कॅनचा दिलेला अहवाल हा देखील तेव्हढाच धक्कादायक आहे….!केअरने दिलेल्या अहवालात तिच्या मणक्याचे हाड हे पूर्णपणे मोडले असून….तिची प्रकृती गंभीर असल्याचे नमूद केले आहे.
घटना २३ डिसेंबरला पंचनामा गणतंत्र दिनी!
घटना २३ डिसेंबर रोजी घडली,एफआयआर २६ डिसेंबर रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवल्या गेली मात्र सासू ललिता तामगाडगे,नणद प्राची व नणदेचा नवरा राहूल वासनिक यांनी २३ डिसेंबर रोजीच जामिनासाठी अर्ज सादर केला व त्यांना आता जामिनही मंजूर झाला तर सासरे यांना सात दिवसांचा अंतरिम जामीन २१ जानेवारी रोजी मिळाला.
Comments are closed.