Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आश्चर्य ! कुणी तरी येणार-येणार गं ! नागपुरात गर्भवती कुत्रीचे डोहाळे जेवण

अन् पोलिस अधिकाऱ्यांने दिले कुत्रीचे डोहाळे जेवन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क 05 जानेवारी:- कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. पण जर हेच डोहाळे जेवण एखाद्या श्वानाचे असेल तर..! दचकू नका, नागपुरात एका कुटुंबाने आपल्या लाडाच्या श्वानाचे मोठ्या थाटामाटात डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घेतला आहे. ऐकावे ते नवलच…एका पोलिस अधिकाऱ्याने चक्क घरी पाळलेल्या कुत्रीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला. शेजारी आणि नातेवाईकांना बोलावण्यात आले. कुत्रीला सजवून पाळण्यात बसवले आणि केक कापून आनंदोत्सव साजरा केला. या अजब कार्यक्रमाचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मिडियावर चांगले व्हायरल होत आहेत. प्राण्यांप्रती प्रेम आणि आपुलकी व्यक्त केल्याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचे कौतूक केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अरूण बकाल हे नागपूर शहर पोलिस दलात आहेत. सध्या ते शांतीनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. ‘ॲनिमल लव्हर’ म्हणून त्यांची ओळख आहे. कुत्रे, मांजर, गायी आणि पशू-पक्षांवर प्रेम व्यक्त करीत त्यांना चारा-पाणी देत असतात. त्यांच्या मित्राने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी त्यांना लॅब्रा प्रजातीचे एक कुत्र्याचे पिल्लू गिफ्ट केले होते. त्यांनी त्याचे नाव ‘विन्नी’ ठेवले होते. महिन्याभरात विन्नी ही बकाल कुटुंबातील सदस्य बनली. त्यांची पत्नी आरती आणि मुलगा अनिष यांनी विन्नीला भरपूर प्रेम दिले. गेल्या दोन वर्षांपासून विन्नीचा मुलीप्रमाणेच वाढदिवस साजरा करण्यात येत होता. गेल्या दीड महिण्यांपूर्वी विन्नीला डॉ. राऊत यांच्या दवाखाण्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी विन्नी प्रेग्नंट असल्याचे सांगितले. विन्नी आता ‘गुड न्यूज’ देणार म्हणून बकाल कुटुंबीयांनी तिची मुलीप्रमाणे काळजी घेतली. तिचे खाणे-पीणे तसेच वारंवार डॉक्टरांकडे नेण्यात येत होते. येत्या काही दिवसांतच तिची प्रसुती होणार आहे. त्यामुळे तिच्या डोहाळे जेवनाचा कार्यक्रम आयोजित करण्याची कल्पना त्यांना सूचली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

विशेष म्हणजे, डोहाळ जेवण कार्यक्रमासाठी झोका, धनुष्यबाण, फुलांची सजावट आणि पारंपारिक गाणी लावण्यात आली होती. त्यासाठी वैष्णवी आणि स्नेहा यांनी सर्व सजावट केली. एवढंच नव्हे तर, गर्भवती महिलेला डोहाळ जेवणाला ज्याप्रमाणे हिरवी साडी-चोळी घेतली जाते, त्याचप्रमाणे विन्नीलाही खास शिवलेला हिरवा ड्रेस घालून हेअरस्टाईल करून नटवण्यात आले होते. तर परिसरातील महिलांनीही या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. यावेळी महिलांनी विन्नीचे औक्षण करून ओटीही भरली. सध्या या डोहाळजेवणाची नागपुरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. अशा श्‍वान प्रेमामुळे बकाल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments are closed.