Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागपूर विद्यापीठाचा 9,429 विद्यार्थ्यांना दणका

विद्यापीठाने पुन्हा ॲानलाईन परिक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर  डेस्क 13 जून :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने 9 हजार 439 विद्यार्थ्यांना दणका दिला आहे. विद्यापीठाने पुन्हा ॲानलाईन परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी फेटाळून लावली आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी परीक्षेत नागपूर विद्यापीठातील तब्बल 9 हजार 429 विद्यार्थी नापास होणार आहेत.

कोरोनामुळे नागपूर विद्यापीठाने सर्व परीक्षा ॲानलाईन घेण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार, हिवाळी परीक्षेत काही तांत्रिक अडचणी किंवा महत्त्वाच्या कारणास्तव परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ पुर्नपरीक्षा घेते. पण पुर्नपरीक्षेची मागणी करताना समाधानकारक कारणं न दिलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना पुरेसा वेळ मिळून परीक्षा दिली नाही, अशा विद्यार्थांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी नागपूर विद्यापीठाने फेटाळून लावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे हिवाळी परीक्षेत पुर्नपरीक्षेची मागणी फेटाळल्याने 9 हजार 429 विद्यार्थ्यांनी फेल होणार आहे. पहिल्या फेजमध्ये 3 हजार 895 तर दुसऱ्या फेजमध्ये 5 हजार 534 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी अमान्य केली आहे, असं नागपूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रफुल्ल साबळे यांनी सांगितलं.

Comments are closed.