Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैधरित्या रेती, मुरुम उत्खनन करणा-यांवर कारवाई करा: संतोष ताटीकोंडावार यांची निवेदनातून मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

गडचिरोली, दि. १ नोव्हेंबर :सिरोंचा तालुक्यात अवैधरित्या रेती व मुरूमाचे उत्खनन होत असल्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडाला असल्याने अवैधरीत्या काम करणाऱ्या कंत्राटदारांची योग्य चौकशी करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून परवाने रद्द करण्यात यावे. अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी तहसिलदारांना निवेदनातून केली आहे.

रेती व मुरुम कंत्राटदार अवैधरित्या मुरुम व रेतीचे उत्खनन करुन तेलंगणा राज्यात तस्करी व विक्री करीत आहेत. तसेच छत्तीसगड राज्यातील काही रेती कंत्राटदार सुद्धा याचप्रकारे आपल्या राज्यात अवैधरित्या प्रवेश करुन अवैधरित्या रेती व मुरुम आयात करीत आहेत. यामुळे शासनाच्या लाखोंच्या महसूलाला चुना लावल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कंत्राटदारासह संपूर्ण वाहनांची चौकशी करुन तसेच वाहतुक करणाऱ्या वाहनांचे एक्सल लोड प्रमाणे काटा करून वाहन अतिरीक्त लोड असल्यास किंवा नियमाबाह्य आढळल्यास त्या वाहनांचे तसेच कंत्राटदारांचे परवाने रद्द करून कठोर शिक्षा व दंड ठोठविण्यात यावे, अशी मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.