Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी-आल्लापल्ली डांबरीकरणाचे कामे 15 दिवसात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

अहेरी तालुका काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची घेतली भेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी,  2 मार्च :-अहेरी – अल्लापल्ली मार्गाची मागील दोन वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. खड्डे बुजवून थातूरमातूर उपाय सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांकडून आदरणीय गडकरी साहेबांना वर्षभरापूर्वी निवेदन दिली आपल्या विभागातील सर्व वर्तमानपत्रात प्रसिद्धी दिली तरीसुद्धा जैसे थे, दोन महिन्यापूर्वी खड्डे बुजवून डांबर पॅच करण्यात आली परंतु काही कालावधीतच हा रस्ता फार खराब झालेला आहे. दुचाकी व चार चाकी वाहनांना, वाहन चालवताना फार त्रास सहन करावा लागत आहे, महिलांना तर या मार्गावरून गाडी चालवणे मुश्किल झालेले आहे.

किती निवेदने देऊन पेपरात प्रसिद्धी देऊन काहीच होऊन राहिलेले नाही, ही बाब अहेरी तालुका काँग्रेस कमिटीचे लक्षात येताच, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी आज चर्चा करण्यात आली व त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्ता मंजुरीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती दिली 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू न झाल्यास अहेरी तालुका काँग्रेस कमिटी कडून तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.याप्रसंगी अहेरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष डॉक्टर निसार हकीम तसेच अशोक आईंचवार. रज्जाक पठाण, बबलू सडमेक, नामदेव आत्राम, राघोबा गोरकर, रुपेश बंदे ला, हनीफ शेख व समस्त कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.