Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहमदाबाद गुलाबी कसोटीत टीम इंडियाचा मोठा विजय, इंग्लंडवर 10 विकेट्सने मात, मालिकेत 2-1 ने आघाडी

Get real time updates directly on you device, subscribe now.

टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीत पराभूत करत 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम खेळवण्यात येत आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहमदाबाद , दि. 25 फेब्रुवारी:: टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशीच इंग्लंड वर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला विजयासाठी अवघ्या 49 धावांचे आव्हान दिले होते. रोहित शर्माने नाबाद 25 तर शुबमन गिलने नाबाद 15 धावा केल्या.

सामना दुसऱ्या दिवशी निकाली
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी दोन्ही डावात मिळून मिळून 20 पैकी 19 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. तर एकमेव विकेट ही वेगवान गोलंदाजाच्या खात्यात गेली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

लोकल बॉय अक्षर पटेलने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 अशा एकूण 11 विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने पहिल्या आणि दुसऱ्या डावात मिळून एकूण 7 विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि इशांत शर्माला 1 विकेट मिळाली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.