Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कर्नाटकात सत्ताबदल! भाजपाच्या दक्षिणेचे दरवाजे झाले बंद

2018च्या तुलनेत काँग्रेसने तब्बल 50 जागा जास्त जिंकल्या असून भाजपला मोठा धक्का बसला आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

Karnataka Assembly Election 2023 – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे.दक्षिण भारताने आता भाजपसाठी आपले दरवाजे कायमचे सीलबंद केले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे. कर्नाटकच्या मतदारांनी धार्मिक ध्रुवीकरण आणि फुटीरतावादी राजकारणापेक्षा विकास आणि धर्मनिरपेक्षता निवडली आहे, याचे समाधान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले.

2018च्या तुलनेत काँग्रेसने तब्बल 50 जागा जास्त जिंकल्या असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. सायंकाळी जाहीर झालेले निकाल आणि मतमोजणीतील आघाडीनुसार, काँग्रेसच्या पारड्यात 136 जागा जाताना दिसत आहे. तर, भाजपला 64 जागांवर विजय मिळाला आहे. एक्झिट पोलमध्ये किंगमेकर राहण्याची शक्यता वर्तवलेला जनता दल सेक्युलरने 20 जागांवर विजय मिळवला आहे. निवडणुकीतील या विजयानंतर देशभरात काँग्रेसने जल्लोष साजरा केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कर्नाटकमधील मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान केल्याने आता पक्षाला स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करता येणार आहे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी दक्षिणेतील महत्त्वाच्या राज्यात झालेला हा पराभव भाजपसाठी धक्का मानला जात आहे. कर्नाटक निवडणुकीच्या निकालांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यूपीएच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला आहे, और अब दिल्ली दूर नही अशी भावना सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

 

 

Comments are closed.