Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोरोना काळात बँकांचा वेळात बद्दल ; काय आहे बदल इथे वाचा सविस्तर

कामकाजाची सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवायचा सल्ला दिला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 21 मे: देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन ही लागू केलेला आहे. पण देशातील अर्थ व्यवहार सुरू आहेत. त्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या बँका तर गेला वर्षभर कोरोनाच्या भीषण परिस्थितीतही सुरू होत्या. आता दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन इंडियन बँक्स असोसिएशनने  बँकांना ग्राहकांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठेवायचा सल्ला दिला आहे.

आयबीएने गेल्या महिन्यात स्टेट लेव्हल बँकिंग कमिटीला (SLBC) एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, देश आता कोरोना विषाणूच्या म्युटंटमुळे निर्माण झालेल्या दुसऱ्या लाटेच्या भीषण परिस्थितीतून जात आहे. दररोज नवे रुग्ण सापडण्याचं प्रमाण वाढत असल्याची माहिती विविध राज्यांतून आम्हाला मिळाली आहे. ही परिस्थिती आर्थिक व्यवहारांच्या दृष्टिनी चिंताजनक आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आयबीएने केलेल्या या सूचनेनुसार सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी कामकाजाची वेळ कमी करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या त्या भागातील कोरोना महामारीच्या प्रादूर्भावाच्या परिस्थितीनुसार या सूचनेची अंमलबजावणी कशी करायची याचा निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यातील एसएलबीसीला आहे. त्यामुळे जर तुम्हाला बँकेत कामासाठी जायचं असेल तर बहुतांश बँकांची वेळ सकाळी 10 ते दुपारी 2 आहे आणि ही वेळ 31 मे 2021 पर्यंत लागू राहील हे लक्षात ठेवा.

या महिना अखेरीपर्यंत डिपॉझिट स्वीकारणे , पैसे काढणे , रेमिटन्स आणि सरकारी योजनांशी संबंधी कामं या सर्वप्रकारच्या कामांसाठी बँकेने दररोज 4 तास वेळ देणं सक्तीच केल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.