Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी-६० जवानासोबत झालेल्या चकमकीत १३  जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते, त्यांना कंठस्नान घालण्यात सी-६० जवानांना यश मिळाले. मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी- ६० तील जवान व पोलीस यांचे मनापासून अभिनंदन करतो असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गौरवोद्गार काढले.

तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असून त्याचाच हा एक भाग म्हणून आज पहाटे १३ नक्षलवाद्यांचा सी-६० जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा या चकमकीत शामील असलेल्या सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करतो असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गार काढले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या धुमचक्रीत 13 नक्षल्याना कंठस्नान

‘म्युकरमायकोसिसचे पुण्यात 300 पेक्षा जास्त रुग्ण

Comments are closed.