Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश


गडचिरोली: आज दिनांक २६/०९/२०२१ रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोठी
हद्दीतील छत्तिसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फुलनार जंगल
परीसरात नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याच्या व घातपाताची मोठी योजना असल्याच्या
गोपनिय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले.

सदर परीसरामध्ये कॅम्प उध्वस्त करण्याकरीता गेले असता दुपारी ०४.३० ते ०७.०० वाजेच्या दरम्यान कंपनी- १० व भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला असता, पहिल्यांदा चकमक घडून आली. त्यावेळी नक्षलवाद्यांनी पळ काढला. त्यानंतर जवानांनी पाठलाग केला असता, पुन्हा नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला तेव्हा दुसऱ्यांदा चकमक घडून आली. तिथुन नक्षल्यांनी पळ काढल्यानंतर जवानांनी पुन्हा नक्षलवाद्यांचा पाठलाग करीत असतांना तिसऱ्यांदा चकमक घडूनआली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी नक्षलवाद्यांनी संधीचा फायदा घेत घटनास्थळावरुन पळ काढला. जवानांनी न
डगमगता त्याना प्रत्युत्तरादाखल सडेतोड उत्तर देत, नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले यात
जवानांना नक्षलवाद्यांचा मोठा कॅम्प उध्वस्त करण्यात मोठे यश मिळाले.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता नक्षलवाद्यांचा
मोठा कॅम्प असल्याचे दिसून आले. घटनास्थळावरुन आयईडी, मोठया प्रमाणावर व नक्षल साहित्य
हस्तगत करण्यात आले. आयईडी हे अत्यंत सतर्कतेने जागेवरच नष्ट करण्यात आले असुन जवानांनी
नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांची घातपाताची मोठी योजना उधळुन लावण्यात यश मिळविले आहे. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, पोलीस उपअधिक्षक
(अभियान) भाऊसाहेब ढोले, सी-६० प्राणहिताचे प्रभारी अधिकारी. योगीराज जाधव यांनी
सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परीश्रम घेतले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘विशेष अभियान पथकाच्या जवानांच्या शौर्यपुर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले असून, सदर परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्याचे
संकेत दिले.

Comments are closed.