Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केली गोमातेची पुजा

श्रध्दा असवी तर अशी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ब्रिटन, 25 ऑक्टोबर :- भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी वर्णी लागलीय. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतासाठी ही अभिमानाची बाब आहे. ऋषी सुनक यांना 185 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला तर त्यांचे प्रतिस्पर्धी पेनी माॅईंट यांना केवल 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला.

ऋषी सुनक हे 28 ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील. अवघ्या 42 व्या वर्षी सुनक यांच्या हाती ब्रिटनचा कारभार आला आहे. ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्तींचे जावई आहेत. लिझ ट्रस यांनी अवघ्या 45 दिवसांत पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे राजकारण ढवळून निघाले. माजी पंतप्रधान बोरिस जाॅन्सन, पेनी माॅईट आणि ऋषी सुनक हे तिघे रिंगणात होते. मा., सत्ताधारी कंझरव्हेटिव्ह पक्षाच्या बहुतांशी खासदारांनी सुनक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे जाॅन्सन यांनी सुरूवातीला माघार घेतली. त्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 पर्यंत पेनी माॅईंट यांनीही माघार घेतली. त्यानंतर ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील अशी घोषणा कंझरव्हेटिव्ह पक्षांने केली. बिटिशांनी तब्बल 150 वर्षे भारतावर राज्य केले. त्याच ब्रिटिशांवर आता भारतीय वंशाच्या व्यक्तीचे राज्य आले आहे. ऋषी सुनक यांनी इतिहास रचला आहे. त्यामुळे भारतातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ऋषी सुनक यांचा काही महिन्यांपूर्वीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऋषी सुनक हे लंडन येथे गोमातेची पुजा करतांना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. यांचा हा व्हिडिओ पाहिज्यानंतर सुनक यांची गायीवर किती श्रध्दा आहे हे दिसून येते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.