Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची आरटीपीसीआर कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांना किंग्जवे हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले आहे.
  • सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नागपूर डेस्क, दि. १० एप्रिल: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना नागपूरच्या किंग्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या कोरोनाची सामान्य लक्षण दिसत आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते सध्या नागपुरातील किंग्स रुग्णालयात उपचार घेत आहेत,” असे ट्वीट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकृत ट्वीटरवरुन करण्यात आलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांना रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान गेल्या महिन्यात ६ मार्चला मोहन भागवतांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. मोहन भागवत यांच्यासह संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनीही कोरोना लस घेतली होती. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी कोरोना लसीकरण केले होते. त्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नीनेही संस्थेत कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

Comments are closed.