Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु.

तेजस्वी आणि तेजप्रताप यांचं भविष्य आज मतदान यंत्रात बंद होणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:

पटना दि. ०३ नोव्हें : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सुरु झालं आहे. एकूण १७ जिल्ह्यातील ९४ मतदारसंघात मतदान होत आहे. एकूण १ हजार ४६३ उमेदवारासाठी आज मतदान होत आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दल अर्थात RJDचे नेते तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांचं भविष्यही आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण १ हजार ४६३ उमेदवार रिंगणा आहेत. त्यापैकी १४३ महिला तर एक ट्रान्सजेंडर उमेदवार आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण २ कोटी ८५ लाख ५० हजार २८५ मतदार आपला हक्क बजावतील. यात १ कोटी ३५ लाख १६ हजार २७१ महिला तर ९८० ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

बिहारमध्ये बदलाची सुनामी- तेजस्वी यादव

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

‘बदलाच्या या सुनामीमध्ये बिहार शिक्षण, उत्पन्न, आरोग्य, सिंचन आणि महागाई या अजेंड्यावर मतदान करेल. मला विश्वास आहे की लोकांना बदल हवा आहे. बिहारची जनता बदल घडवण्यासाठी मतदान करेल. पहिल्या टप्प्यातील मतदानापासून हे स्पष्ट झालं आहे’, अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी ठीक मतदान सुरु होण्यापूर्वी दिली आहे.

दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राघोपूर मतदारसंघातील 24 नंबरच्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. बिहारमध्ये चिराग पासवान यांनी NDA तून बाहेर पडत दंड थोपटल्यानं निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

Comments are closed.