Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गुढीपाडव्यापासून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी मंदिर प्रशासन अनुकूल : देवस्थान समितीच्या बैठकीत निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पंढरपूर, दि. २५ मार्च :  गुढीपाडव्यापासून विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्याबाबत पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अनुकूल आहे. याबाबतचा निर्णय मंदिर समितीच्या सदस्यांनी एकमताने घेतला असल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. पदस्पर्श दर्शनाबाबतचा एक प्रस्ताव राज्य शासनाकडे मंदिरे समिती सादर करणार आहे.

राज्य शासनाच्या मंजुरीअंती पंढरपूरच्या विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन सुरू होण्याबाबत शिक्‍कामोर्तब होईल. मुर्तीस स्पर्श करून दैवतांचे दर्शन घडणारे. राज्यातील एक मोठे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरकडे पाहिले जाते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १७ मार्च २०२० सालापासून पंढरपूरच्या विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन बंद आहे. सध्या कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असताना. देशभरात सर्वाधिक लसीकरण झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अशा परिस्थितीमध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल होत आहेत. परिणामी विठ्ठल भक्तांना थेट पदस्पर्श दर्शन घडवण्यात यावे. तसेच भाविकांकडून नित्यपूजा व चंदनउटी पूजा घडावी. यासाठी आता मंदिरे समिती प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताने आपले गतवैभव पुनश्च प्राप्त करावे” : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

देशाच्या निर्यात क्षेत्रात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

धक्कादायक! तीन शाळकरी मुलांचा ओढ्यात बुडून मृत्यू; गावावर पसरली शोककळा

 

 

Comments are closed.