Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर…काय म्हणाली योगींची बहीण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

नवी दिल्ली, २५ मार्च : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये (UP Election 2022) भाजपला प्रचंड यश मिळाले. दुसऱ्यांदा युपीचा गड राखल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योगी आदित्यनाथ 25 मार्च रोजी लखनऊच्या एकना इंटरनॅशनल स्टेडियमवर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. शपथविधीच्या आधी योगी आदित्यनाथांच्या बहिणीने इच्छा व्यक्त केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात” असं योगींच्या बहिणीने म्हटलं आहे.

तसेच योगींच्या मेहुण्याने त्यांचा एक किस्सा देखील सांगितला आहे. योगी आदित्यनाथ यांची बहीण आणि त्यांचे मेहुणे योगींच्या शपथविधीच्या विषयावर एका वाहिनीशी बोलत होते. याच दरम्यान पत्रकाराने त्यांची बहीण शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात प्रश्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि नरेंद्र मोदींची Narendra Modi इच्छा असेल तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे, असंही म्हटलं आहे. योगी यांच्या मेहुण्याने सांगितले की, “आमच्या लग्नानंतर जवळपास 2 वर्षे ते आमच्यासोबत आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासोबतच त्यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ यांना काही चुकीच्या गोष्टींचा राग यायचा आणि ते आम्हालाही फटकारायचे. गावात आमच्याकडून कुठलीही चूक झाली तर ते रोखायचे. तसेच “आमचे लग्न झाले तेव्हा योगी आदित्यनाथ बीएससी करत होते. ते त्यांच्या अभ्यासात व्यग्र होते त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. योगी आदित्यनाथ नेहमी म्हणायचे की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये गुंतत आहात त्यामध्ये मी कधीही पडणार नाही. मी असे काहीतरी करेन ज्यामुळे आपले नाव संपूर्ण जगात पोहोचेल” असंही म्हटलं आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे – मंत्री, ॲड. अनिल परब यांचे एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

https://loksparsh.com/news/chief-minister-uddhav-thackeray-unveils-mahayuva-app/256

 

Comments are closed.