Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यात काही तासात विजांच्या गडगडाटासह मुसळधार…4 जिल्ह्यांना High अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. २५ मार्च :  आग्नेय बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाची (Low pressure area) तीव्रता सध्या कमी झाली आहे. तरी देशाच्या पश्चिम किनारपट्टी परिसरात अवकाळी पावसाचे rain ढग (Cloudy weather) घोंघावत आहेत. आज सकाळपासूनच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, गोव्यातील काही भाग आणि कर्नाटक किनारपट्टी परिसरात ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. यासोबतच पुणे, सातारा, आणि मराठवाड्यातील काही भागात देखील अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहे. हवामान खात्याने आज सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासात याठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त आज पुण्यासह रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या सात जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची rain शक्यता आहे. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. उद्यापासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उद्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली या तीन जिल्ह्यातच तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात मात्र कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात पावसाची स्थिती असताना विदर्भातील काही जिल्ह्यांत मात्र उन्हाचा चटका आणखी तीव्र झाला आहे. आज अकोल्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून येथील पारा 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ अमरावतीत 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं आहे.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर…काय म्हणाली योगींची बहीण

महिला डॉक्टरांच्या आत्महत्तेने नांदेड शहरात खळबळ

कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे – मंत्री, ॲड. अनिल परब यांचे एसटीच्या कर्मचाऱ्यांना आवाहन

 

Comments are closed.