Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. पहा कुणाची बदली कुठे..!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मुंबई, दि. १२ ऑक्टोंबरमहाराष्ट्र राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने आज एका अध्यादेशाद्वारे आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

श्रीमती मिताली सेठी यांची बदली संचालक वनमती नागपूर येथे बदली झाली आहे. श्रीमती मिताली सेठी या २०१७ च्या बॅच च्या अधिकारी आहेत. २००६ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी श्री.विरेंद्र सिंह हे वैदयकीय शिक्षण मुंबई चे आयुक्त होते त्यांची बदली महाराष्ट्र आय.टी. कॉर्पोरेशन मुंबई च्या एमडी पदी नियुक्ती झाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुशील चव्हाण यांची असंघटित कामगार मंत्रालय मुंबई च्या डेव्हलपमेंट आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रपूर चे जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांची नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.

नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. दीपक कुमार मीना यांची बदली भटक्या विमुक्त जाती आयोग ठाणे च्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती केली आहे. तर सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गोडा यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

श्री. आर.के.गावडे यांची नंदुरबार जिल्हा परिषदेतून मुंबईच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर श्री. माणिक गुरसाल यांची अतिरिक्त आयुक्त (इंडस्ट्रीज) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच शिवराज श्रीकांत पाटील हे पूर्वी सह. कार्यकारी संचालक सीडको होते त्यांची बदली महानंदच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री आस्तिक कुमार पांडे यांनी नेमणूक औरंगाबाद चे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. श्रीमती लीना बनसोड यांची नियुक्ती एम.डी.म्हणून महाराष्ट्र स्टेट को-,ऑप. भटक्या विमुक्त विकास महामंडळ नाशिक येथे झाली आहे.तर महाराष्ट्र स्टेट को-ऑप. भटक्या विमुक्त विकास महामंडळ चे एमडी दीपक सिंगला यांची नेमणूक जॉईंट कमिशनर एमएमआरडीए मुंबई येथे झाली आहे.

श्री. एल.एस.माळी हे फी रेगुल्यारीटी एथोरीटी मुंबई चे सेक्रेटरी होते त्यांची बदली संचालक ओबीसी बहुजन वेलफेअर डिरेक्टरेट पुणे म्हणून नियुक्ती झाली आहे. एस.सी. पाटील हे जॉइन्ट सेक्रेटरी , डेप्युटी चिफ मिनिस्टर मंत्रालय येथे नेमणूक झाली आहे.

तर डी. के.खिल्लारी यांची जॉईंट इन्स्पेक्टर जनरल ऑफ स्टॅम्प वरून सीइओ म्हणून सातारा जिल्हा परिषद येथे झाली आहे.

जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी सिध्दाराम सालीमठ (भाप्रसे) यांची सिडको सह व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती तर नाशिक विभागीय अतिरिक्त आयुक्त भानुदास पालवे यांची जिल्हा परिषद पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. एस.के. सालीमठ यांची सीईओ पालघर जिल्हापरिषद वरून जॉईंट एमडी सिडको म्हणून बदली झाली आहे. तर एस.एम.कुरकोटी यांची सीईओ म्हणून नंदुरबार जिल्हापरिषद येथे बदली झाली आहे.

श्री. आर.डी., निवतकर मुंबई कलेक्टर यांची बदली कमिशनर मेडिकल शिक्षण विभाग आणि अतिरिक्त चार्ज मुंबई जिल्हाधिकारी म्हणून केली आहे.,बी.एच. पालवे यांची नाशिक जिल्हा परिषद सीईओ म्हणून बदली झाली आहे. तर जॉईंट सेक्रेटरी महसूल स्टॅम्प आणि फॉरेस्ट विभाग मंत्रालय म्हणून आर.एस.चव्हाण यांची नेमणूक झाली आहे.

हे देखील वाचा : 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘पंढरीची वारी’ प्रदर्शनास भेट

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराची नोंदणी दि. 13 ऑक्टोंबर पासून सुरु

Comments are closed.