Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धक्कादायक! पतीनेच केली पत्नीची निर्घुण हत्या

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील घटना... हत्या करून पतीने स्वत: पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

चामोर्शी, दि. २५ एप्रिल : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे राहणाऱ्या एका दाम्पत्यात घरघुती भांडणावरून पतीने पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही खळबळजनक घटना रविवार दिनांक २४  एप्रिल २०२२ रोजी सकाळच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे आष्टी शहरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, विद्या देविदास चौथाले (२४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून देविदास पुंजाराम चौथाले (३०) असे आरोपी पतीचे नाव आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आष्टी येथील रहिवासी देविदास चौथाले याचा आंतरजातीय विवाह २ वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे या तरुणीशी झाला होता. या दोघांत सातत्याने वाद होत असल्याने काल दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पतीने (आरोपी) पत्नीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून तिची हत्या केली व स्वतः आष्टी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले आहे.

आष्टी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनास्थळ गाठले असून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात उपपोलीस निरीक्षक गणेश जंगले यांच्या तपासणी पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी ४ किमी अंतर डोलितून पायपीट..

वनविकास महामंडळाचे नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे – एन. वासुदेवन

 

Comments are closed.