Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय विज्ञान महाविद्यालय,गडचिरोली येथे दोन दिवसीय राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषदचे यशस्वी आयोजन

संशोधनात बहुआयामी अभ्यास आवश्यक : डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि.11 एप्रिल : शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली आणि भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना, अमरावती चैपटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय बहुशाखीय वैज्ञानिक परिषद’-2022 या विषयावर दोन दिवसीय शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक 07 आणि 08 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले.

गडचिरोली-ग्रामीण आदिवासी बहुल भागात भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना यांची 108 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त्याने यामार्फत विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण होण्यासाठी तसेच मार्च-2021 पासून च्या जागतिक कोरोना महामारी काळानंतर पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात पारंपारिक प्रत्यक्ष सदर परिषदेचे उद्घाटन डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना,अध्यक्ष भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना,कोलकोता यांच्या शुभहस्ते झाले.तसेच डॉ.अशोक कुमार सक्सेना माजी अध्यक्ष,भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना,कानपूर,डॉ. शिव सत्य प्रकाश,भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना, कोलकोता,डॉ.मनोजकुमार चक्रबर्ती,डॉ.निबेदिता चक्रबर्ती,डॉ.अतुल बोडखे अमरावती चापटर निमंत्रक,डॉ.गजानन संतापे अमरावती चापटर निमंत्रक,डॉ.आर. जि. मुनघाटे प्राचार्य कुरखेडा महाविद्यालय ,डॉ . राजेश दहेगावकर, प्राचार्य डॉ. आंबेडकर महाविद्यालय,चंद्रपूर,डॉ.एन.कोकोडे प्राचार्य एन. एच. महाविद्यालय,ब्रम्हपुरी आणि आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ.विजयलक्ष्मी सक्सेना यांनी संशोधनात बहुआयामी अभ्यास असण्यावर भर दिला,संशोधनात समर्पण आणि संयम ठेवायला हवा,संशोधन समाज आणि देश उपयोगी असायला हवे असे त्यांनी सांगितले.दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेमध्ये डॉ.प्रो देववालिया पर्यावरण अभ्यास विभाग,उत्तर-पूर्व विद्यापीठ,शिलॉंग,डॉ.लाल सिंग वरिष्ठ वैज्ञानिक, CSIR- NEERI आणि डॉ.इटनकर फार्म्लाकॉलोगी विभाग रा.तू.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर यांचे विशेष व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे. विशेष व्याख्यानात यांनी सद्य संशोधन परिस्थितीचा थोडक्यात आढावा घेतला आणि त्यांनी स्वतः केलेल्या संशोधन कार्याचे सादरीकरण केले आणि उपस्थित सर्व संशोधन विद्यार्थी, शिक्षक कर्मचारी यांना नवीन दिशा दर्शनाचे कार्य केले.या विशेष व्याख्यानासाठी प्रो.डॉ. सुरेश झाडे,माजी विप्र. प्राणीशास्त्र विभाग,रा.तू.म. नागपूर विद्यापीठ,नागपूर,डॉ. शिव सत्य प्रकाश,भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना,कोलकोता, डॉ. अतुल बोडखे,अमरावती चापटर निमंत्रक यांचे अध्यक्षीय स्थान लाभले.

सदर राष्ट्रीय परिषदेमध्ये देशातून आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या संशोधन विद्यार्थी,शिक्षक कर्मचारी यांनी संशोधन आधारित मौखिक सादरीकरण केले त्याकरिता डॉ.अमित सेटिया, शुभम मदान आणि एन. बि. सेलोटे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त झाले आणि भित्तीपत्रक पोस्टर सादरीकरण मध्ये सहा. प्राध्यापिका नीलिमा रंगारी एन.एच. महाविद्यालय,ब्रम्हपुरी आणि श्र सोनल काराम्बे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाले.
तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली च्या सत्र 2020-21 च्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त महाविद्यालयातील माजी बि. एस्सी. आणि एम. एस्सी अंतिम विद्यार्थ्यांचे सुद्धा गुण गौरव करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.. हेमलता आणि डॉ. अतुल बोडखे,भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना, अमरावती कक्ष परिषदेसाठी मुख्य संयोजक होते. . कार्यक्रम अध्यक्ष प्राचार्या डॉ हेमलता चौधरी वानखेडे यांनी गडचिरोली- ग्रामीण आदिवासी बहुल भागात भारतीय विज्ञान कॉंग्रेस संघटना परिषदेचे आयोजन निमित्त्याने या भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात संशोधन करण्यासाठी आवाहन केले आणी योग्य मार्गदर्शन केले.

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत निमंत्रक म्हणून डॉ. अब्दुल चौधरी , विप्र. भौतिकशास्त्र शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली आणि प्रा. अमर कुरील विप्र. वनस्पतीशास्त्र शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली यांनी सह- निमंत्रक म्हणून कार्य पार योग्य रित्या कार्य पार पाडले. तसेच सर्व शिक्षक डॉ. मंदार पैगणकर विप्र. प्राणीशास्त्र , प्रा. सत्येन पाटील विप्र. रसायनशास्त्र, प्रा. संतोष अष्टपुत्रे डॉ. एस. पुनवटकर ग्रंथपाल,डॉ. सुरजसिंग येवतीकर संचालक शारीरिक शिक्षण,तसेच अंशकालीन शिक्षक कर्मचारी,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी आयोजनासाठी परीश्रम घेतले. सदर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.रोशन नासरे आणि कु.श्रुती संगोजी यांनी कार्यक्रमाचे संचालन तर प्रा.अमर कुरील यांनी आभार प्रदर्शन केले.

हे देखील वाचा : 

महात्मा ज्योतिबा फूले यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली

 

Comments are closed.