Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून; पोलिसांकडून शोधमोहीम सुरूच

अहेरी नजीकच्या चिंचगुंडी प्राणहिता नदीघाटावरील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २ मार्च : महाशिवरात्री निमित्त अहेरी नजीकच्या चिंचगुंडी प्राणहिता नदीघाटावर आंघोळीसाठी गेलेला युवक नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.

करण चरणदास कांबळे (२२) रा. चेरपल्ली असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. महाशिवरात्री निमित्त शिवभक्त अहेरी जवळच्या चिंचगुंडी येथील नदीघाटावर आंघोळीला गेले. त्यात चेरपल्ली येथील काही तरूण गेले असताना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने करण हा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची बातमी सोबत हजर असलेल्या तरुणांना कळली. या प्रकारची माहिती तरुणांनी करणच्या नातेवाईकांना दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यासंबंधीची तक्रार वाहून गेलेल्या युवकाच्या काकांनी पोलीस स्टेशन अहेरी येथे मंगळवारी सायंकाळी ६.०० वाजता दिली. पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून शोधमोहीम सुरु केली. मंगळवारी रात्रीपर्यंत त्याचा शोध लागला नसून बुधवारीही पुन्हा शोधमोहीम सुरु केली असून वृत्त लिहितोत्सव वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागला नाही. अशी माहिती मिळाली आहे.

अहेरीचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात नदीपात्रात शोधमोहीम सुरु आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

विज्ञानाच्या तत्वांचा अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करा – जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली जिल्ह्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा रद्द : जिल्हाधिकारी संजय मीणा

 

 

Comments are closed.