Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंदिया जिल्ह्यातील ग्राम सेवकांचा विविध मागण्याना घेऊन कामबंद आंदोलन.

गोंदिया जिल्ह्यातील 8 तालुक्याचा आंदोलनात ग्रामसेवकाचा समावेश. ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनाचा बसला ग्रामवासियांना फटका...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गोंदिया दि,२६ ऑगस्ट :  विविध मागण्याना घेऊन जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन ( सलग्न महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ )जिल्हा शाखा गोंदिया च्या वतीने ग्राम सेवकांचा कामबंद आंदोलन पुकारले असून आंदोलनात जिल्ह्यातील 8 तालुक्याचा ग्रामसेवकाचा समावेश असून 2ऑगस्ट पासून हे ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलन सुरु असल्याने ग्रामवासियांना फटका बसला आहे. त्यांमुळे दाखल्यांसाठी ग्रामवासियांना वणवण भटकतांना दिसत आहे .

म्याट ने दिलेल्या निर्णयानुसार निलंबित कर्मचाऱ्यांना 90 दिवसापेक्षा ज्यास्त वेळ निलंबित ठेऊ नये, ग्राम विकास अधिकारी गणेश हरडे यांचे प्रकरण, पदोन्नती प्रकरण निकाली काढणे, कालबद्ध पदोन्नती करणे, कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्राम सेवकांचे प्रस्थाव शासनाला पाठविणे आदी अनेक अश्या आपल्या 26 मागण्यांना घेऊन काम बंद आंदोलन पुकारले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने 13 जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांना संघटनेच्या वतीने ग्रामसेवक वर्गावर होणारे अन्याय दूर करून विविध मागण्यांची पूर्तता करणे संबंधाने असहकार आंदोलन पूर्व सूचना पत्र देण्यात आले होती. मात्र या पत्रावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने 2 ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालया समोर साखळी उपोषन सुरु करण्यात होते.  ही दख़ल न घेतल्याने 16 ऑगस्ट पासून संपूर्ण काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या वतीने आंदोलनकर्त्यांच्या मागण्या न मान्य झाल्यास 30 ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयाच्या आलमारीला कुलूप लाऊन चाब्या व सिक्के खंडविकास अधिकारी यांना सोपवुन पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे ह्या आन्दोलनाचा फटका सर्वसामान्यला होत असून ग्रामपंचायत कार्यालयातून दाखले मिळने कठिन झाले आहे.नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.