Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कलापथकाच्या माध्यमाद्वारे जनजागृती अभियान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 25ऑगस्ट  :  भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, महाराष्ट्र आणि गोवा राज्य माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने नागपूरचे संजय तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आजादी का अमृत महोत्सव गडचिरोली जिल्ह्यात साजरा करण्यागत येत आहे.

 

या निमित्ताने  गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील ठाणेगांव ग्रामपंचायतीत 24 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा पंजीकृत संस्था – असर फ़ाउंडेशन, भंडारा कलापथकातील वैभव कोलते, विक्रम फडके, दिपक तिघरे, हर्षल कुंभारे, दामिनी सेलोकर, रागीनी बांते , प्रणाली नंदेश्वयर ह्या कलावंतानी स्वातंत्र्य, लोकशाही, एकता आणि विकासाचा 75 वर्षाचा इतिहास सांस्कृबतीक कार्यक्रामाच्या माध्यमातून जनसामन्यांपर्यंत पोहचविला. कार्यक्रमास जि.प. मुख्याध्यापक कु. जरचांदेकर, शिक्षीका कु. उताणे तसेच बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.  कोविडचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.