Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोरांची शिकार करणाऱ्या दोन संशयित सराईत आरोपींना वनविभागाने केली अटक!

राष्ट्रीय पक्षी मोराची हत्या, हत्यारांसह दोघे संशयित सराईत वनविभागाच्या ताब्यात.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

नाशिक, दि. ४ ऑक्टोंबर: राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची हत्या करणाऱ्या दोघा संशयितांना पोलीस व वनविभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करत नाशिकच्या नांदगावात ताब्यात घेतले आहे.

पोलीस व वनविभाग यांची रात्रीची गस्त सुरू असतांना नाशिकच्या मनमाड जवळील भार्डी व धनेर गावाजवळ संशयीतरित्या फिरत असलेल्या दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांचेकडून भारताचा राष्ट्रीय पक्षी असलेला मोर हा मृतावस्थेत मिळुन आला. मोराच्या मानेला गोळी लागलेली असून मान कापलेल्या अवस्थेत होती.

दरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच या संशयितांनी मोरांची शिकार केल्याचे कबूल केले. मुद्स्सीर अहेमद अकिल अहेमद, जाहिद अक्तर सईद अहेमद रा.मालेगाव या दोघा संशयितांकडून एक मृतावस्थेतील मोर पक्षी, लोखंडी बॅरेल असलेली बंदूक, बुलेट्सची डबी (गोळ्या) कोयता, सुरा, लायटर, विद्युत टेस्टर, कटर, सर्च लाईट,ऑईल बॉटल आदी शिकार करण्याचे साहित्य मिळाले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघे संशयित सऱ्हाईत गुन्हेगार असून यापूर्वीही काळवीट शिकार प्रकरणी त्यांचेवर नाशिकच्या मालेगाव, नांदगांव, येवला तालुक्यातील वनविभागाकडे गुन्हे दाखल आहेत. घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र कार्यालय, नांदगांव करीत आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.