शाओमी युजर्ससाठी गुड न्यूज Redmi Note 9 Pro फोनला Android 11 अपडेट .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क :- जर तुमच्याकडे रेडमी नोट ९ सीरीजचा प्रो डिव्हाइस असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शाओमीकडून मार्च २०२० मध्ये Redmi Note 9 Pro भारतात लाँच केला होता. ग्लोबल मार्केटमध्ये या फोनचला कंपनीने Redmi Note 9S नावाने आणले होते. Android 10 बेस्ड MIUI 11 सोबत आलेल्या फोनला नुकतेच लेटेस्ट MIUI 12 चे अपडेट देण्यात आले आहे. आता भारतात या फोनला Android 11 अपडेट मिळत आहे.
शाओमीकडून MIUI 12 चे अपडेट भारतात Redmi Note 9 Pro युजर्संला सप्टेंबर महिन्यात दिले होते. यानंतर काही आठवड्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ग्लोबल व्हर्जन Redmi Note 9S साठी अपडेट करण्यात आले होते. तसेच MIUI 12 रोलआउट यासाठी पूर्ण झाले आहे. आता अनेक Redmi Note 9 Pro यूजर्सला भारतात Android 11अपडेट मिळत आहे.
शाओमीच्या मिडरेंज डिव्हाइसला मिळालेले लेटेस्ट अँड्रॉयड ११ बेस्ड अपडेटला बिल्ड नंबर V12.0.1.0.RJWINXM आहे. नवीन अपडेट स्टेबल बीटा स्टेजमध्ये आहे. म्हणजेच आता सिलेक्टेड युजर्सला दिले जाणार आहे. बीटा अपडेट मध्ये सर्व बग्स आणि प्रॉब्लेम्सला फिक्स करण्यासाठी या बिल्ड नंबर सोबत स्टेबल अपडेट सर्व डिव्हाइसेजवर दिले जावू शकते. याचाच अर्थ भारतात रेडमी नोट ९ प्रो युजर्संना डिसेंबर पर्यंत Android 11 अपडेट मिळणार आहे.
Comments are closed.