Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिल्लीत मास्कशिवाय आढळलं तर बघा किती आहे दंड.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली :– दिल्लीत करोना संक्रमणाचं वाढत्या प्रमाणामुळे राज्य सरकारसोबतच केंद्रानंही धसका घेतलाय. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल सरकारनं कठोर पाऊल उचलली आहेत. यात, करोना मास्कशिवाय आढळणाऱ्या नागरिकांकडून चौपट दंडवसुली केली जाणार आहे.

नव्या निर्णयानुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणं नागरिकांना अनिवार्य असून मास्कशिवाय आढळल्यास व्यक्तीला २००० रुपयांच्या दंडाची तरतूद याद्वारे करण्यात आलीय. या अगोदर दिल्लीत मास्कशिवाय आढळल्यास ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उपराज्यपालांची भेट घेतल्यानंतर आपण हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय. करोना परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलीय. सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय आढळल्यास २००० रुपयांचा दंड लावण्यात येईल, अशी घोषणाच मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलीय.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दिल्लीत करोना संक्रमणाची तिसरी लाट सुरू असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनलीय. बुधवारी राजधानीत १०० हून अधिक जणांना आपले प्राण करोनामुळे गमवावे लागले. दिल्लीतील संक्रमणाचा फैलाव लक्षात घेत केंद्र सरकारकडूनही प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी करोनावर बैठक घेऊन इतर राज्यांच्या पॅरामेडिकल स्टाफला दिल्ली बोलावण्याचा निर्णय घेतलाय.

Comments are closed.