Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत वादळाचा तडाखा,छत उडाले, झाडे हि पडली

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि ८ : जिल्ह्याच्या दक्षिण भागात अनेक तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे छत उडून बरेच नुकसान झाले, तर काही ठिकाणी झाडे कोसळल्याने रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.

काल पासून हवामान विभागाने दिलेल्या अंदाज खरे ठरले असून काल दि.७  ला दुपार पासून हवामानात बदल दिसून आले, ढगाळ वातावरण आणि  त्यानंतर हवा जोराने येवू लागली .तर संध्याकाळी पुन्हा वादळी पाऊस झाला. त्यात एटापल्ली, चामोर्शी, मुलचेरा, आणि भामरागड तालुक्यातही काही भागात या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर गडचिरोली शहरातही पावसाच्या हलक्या सरी आल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सोमवारच्या रात्री भामरागड तालुक्यात प्रथमता अवकाळी पावसाने हजेरी लावली. मलमपोडूर येथे घरावरील छत उडाले. झाडे कोसळल्याने वीजवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता.

अहेरी आगाराची अहेरी ते कोटी गेलेली बस दि.७ ला सकाळी परत आली नाही. कारण रात्री झालेल्या वादळी पावसामुळे रस्त्यावर झाड कोसळले असल्याने मार्ग बंद झाला तर  एटापल्लीतील आठवडी बाजाराला फटका बसला. मुलचेरा तालुक्यातही मंगळवारी वादळाचा तडाखा बसला. ठाकूरनगर येथे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.