Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात विदेशी पाहुण्यासह तृतीयपंथीही होणार सामील

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वृत्तसंस्था दि 9 :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होणार असून रविवारी नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदींसोबत सुमारे 52-55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये 19 ते 22 कॅबिनेट मंत्री आणि सुमारे 33 ते 35 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून शिवसेनेच्या एका खासदाराला कॅबिनेट तर दोघांना राज्यमंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते. तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधून राजनाथ सिंह, जितिन प्रसाद, एसपी सिंह बघेल आणि पंकज चौधरी मोदी मंत्रिमंडळात शपथ घेऊ शकतात. याशिवाय अपना दल (एस) प्रमुख अनुप्रिया पटेल यांना पुन्हा केंद्रात मंत्रीपदाची संधी आहे. यासोबतच राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांनाही मंत्री केले जाऊ शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जातीपेक्षा प्रादेशिक समतोलावर भर दिला जाणार आहे. मंत्रिमंडळात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भागातल्या खासदारांना संधी मिळणार आहे. मंत्र्यांची निवड करताना त्यांचा अनुभव आणि शिक्षणही विचारात घेतले जात आहे.

एनडीएमध्ये भाजपनंतर चंद्राबाबूंच्या तेलुगू देसम आणि नितीशकुमारांच्या जेडीयूचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे तेलुगू देसमला 4, जेडीयूला 4, लोकजनशक्ती पार्टीला 2 मंत्रिपदं मिळू शकतात. तेलुगू देसम आणि जेडीयू अर्थमंत्रालयासह सभापतीपदाची मागणी करत असल्याचं समजतंय. मात्र संरक्षण, अर्थ, गृह आणि परराष्ट्र मंत्रालय भाजप स्वत:कडे ठेवणार असल्याची माहिती आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

 

केंद्रीय मंत्रिमंडळात एकही जागा अजित पवार गटाला नाही; फडणवीसांकडून गौप्यस्फोट

पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार शपथ; ‘या’ खासदारांचा NDA सरकारमध्ये समावेश?

पुणे शहरात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Leave A Reply

Your email address will not be published.