Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात, मतदानाला सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
मनोज सातवी,

मुंबई डेस्क, दि. १० जून : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे आपापसात सामंजस्याने निवडणूक न करता उमेदवार राज्यसभेची निवडून बिनविरोध करण्याची परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होणार असल्याचे बोलले जात आहे. विधान भवनात सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संध्याकाळी 5 वाजता मत मोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणता सातवा उमेदवार पराभूत होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी हे आहेत ७ उमेदवार रिंगणात.

भाजपचे ३ उमेदवार

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक

शिवसेनेचे दोन उमेदवार

संजय राऊत आणि संजय पवार.

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल

काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी.

राज्यसभेच्या निवडणुकीत असे आहे पक्षीय बलाबल

महा विकास आघाडीचे (MVA) संख्याबळ 167
शिवसेना (55) राष्ट्रवादी काँग्रेस (51) काँग्रेस (44) समाजवादी पार्टी (2) प्रहार जनशक्ती पक्ष (2)

MVA समर्थक अपक्ष आमदार (१३)
1) श्याम सुंदर शिंदे, लोहा
2) किशोर जोरगेवार- चंद्रपूर
3) गीता जैन- मीरा भाईंदर
4) नरेंद्र भोंडेकर- भंडारा
5) आशिष जैस्वाल- रामटेक
6) संजय शिंदे – करमाळा
7) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर
8) मंजुषा गावित – साक्री.
9) विनोद अग्रवाल.
10) शंकरराव गडाख.
11) राजेंद्र यादव
12) विनोद निकोळे. सीपीआय एम
13) देवेंद्र भुयार. स्वाभिमान पक्ष

भाजपला 106+7 अपक्ष म्हणजेच 113 आमदारांचा पाठिंबा आहे.

भाजप (106)

भाजप समर्थक अपक्ष आमदार. ( 7 )

1) प्रकाश आवडे- इचलकरंजी
२) राजेंद्र राऊत- बार्शी
3) महेश बालदी- उरण
4) रवी राणा- बडनेरा
5) विनय कोरे जनसुराज्य पार्टी
6) रत्नाकर गुट्टे. राष्ट्रीय समाज पक्ष
7) राजू पाटील – मनसे

आतापर्यंत तटस्थ असलेले एकूण आमदार 5

बहुजन विकास आघाडी 3

एम आय एन -2

एकूण २८५.

महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत. हे 3 आमदार कमी झाले, आता एकूण 285 झाले आहेत. त्यामुळे
आता 41 चा कोटा असेल.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ जागा निवडून आल्या होत्या. मात्र पंढरपूरमधील आमदारांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला. त्यामुळे सद्यस्थितीत राष्ट्रवादीचं संख्याबळ ५३ इतकं असून यापैकी अनिल देशमुख व नवाब मलिक हे ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. तसंच त्यांना मतदान करू देण्यास न्यायालयाने मनाई केल्याने त्यांची मते सोडून राष्ट्रवादीची संख्या ५१ होते.

धनंजय महाडिक आणि बंटी पाटील यांच्यातील वादामुळे चुरस वाढली

लोकसभा, विधानपरिषद, विधानसभा आणि गोकुळ निवडणुकीत धनंजय महाडिक, महादेवराव महाडिक, अमल महाडिक आणि महाडिक गटाचा पराभव झाला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राज्यपातळीवर झालेल्या घडामोडींमुळे अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागली. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाडिक यांचे भाचे सत्यजित कदम यांना पराभव स्वीकारावा लागला. गेल्या सहा वर्षात एका पाठोपाठ एक पराभव पचवावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी महाडिक परिवाराने संपूर्ण ताकद झोकू दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीची चुरस वाढली असून महाडिक यांच्या प्रयत्नांना यश येते का, हे आज स्पष्ट होणार आहे.

हे देखील वाचा ,

कला विद्यापीठासाठी सांघिक भावनेने काम करण्याची गरज – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून; विद्यार्थी 15 जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर बदली प्रकरणी अन्याय होणार नाही – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Comments are closed.