Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भीषण अपघात! उभ्या ट्रकला बोलेरो ची जबर धडक, धडकेत ४ ठार तर १ जखमी..

चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, १३ ऑगस्ट :- चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे मध्यरात्री च्या सुमारास बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यातील गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात वाहनातील ४ जण जागीच ठार झालेत तर १ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

गडचिरोली येथील डिजे वादक म्हणून प्रसिद्ध असलेले पंकज बागडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथे राहणाऱ्या अनुप ताडूलवार या मित्रासोबत चंद्रपूर येथे डिजे च्या काही साहित्य खरेदीसाठी चालले होते. त्यावेळी त्यांच्या सोबत अनुप ची पत्नी व साळा हे देखील सोबत होते. एकूण पाच व्यक्ती या गाडीतून प्रवास करत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

साहीत्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसान नगर येथे मुख्यमार्गावर गाय बसलेली होती तिला वाचविण्यासाठीच्या प्रयत्नात कट मारत असताना स्टेरिंग राळ तुटला आणि गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की अपघात झाल्यानंतर जोरदार असा आवाज होऊन गाडीचा चेंदामेंदा झाला. भयंकर आवाज ऐकून आसपासचे नागरिक घटनास्थळी जमले, नागरिकांनी  किसानगर व व्याहड खुर्द येथील सावली पोलिसांना संबधित घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती पोलीस विभागाला प्राप्त होताच सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले, व तेथील स्थानिकांची मदत घेत त्या अपघातग्रस्ताना बाहेर काढण्यात आले. परंतु यातील ४ व्यक्ती हे जागीच ठार झाले होते. यापैकी एक व्यक्ती बचावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर  उपचार सुरू आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या अपघातात पंकज किशोर बागडे (२६) रा.गडचिरोली, अनुप रमेश ताडूलवार (३५) रा.विहीरगाव ता.सावली, महेश्ववरी अनुप ताडूलवार (२४) रा.विहीरगाव,मनोज अजय तीर्थगिरीवार (२९) रा.ताडगाव ता.भामरागड जिल्हा गडचिरोली यांचा मृत्यू झाला असून, सुरेंद्र हरेंद्र मसराम (२३) रा.चिखली हा एक व्यक्ती जखमी झाला आहे.

या अपघातात मृत्यू पावलेले गडचिरोली अनुप ताडुलवार हा विहीरगाव येथील माजी सरपंच ताडूलवार यांचा मुलगा आहे. तसेच त्यांची सून, व अनुपचा साळा मनोज या दोघांची मृत्यू झाल्याने जवळपास एकाच कुटुंबातील ३ व्यक्तींच्या जाण्याने ताडूलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र गावातही शोककळा पसरली आहे. संबंधित घडलेल्या घटनेचा पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.

हे देखील बघा :-

Comments are closed.