Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शनिवारी रात्रीपासून गिरणगावात वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग केले बंद ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. ४ सप्टेंबर : सलग आलेल्या दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे गणेशभक्तांनी मोठ्या प्रमाणात आपल्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याने लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी, भारतमाता, डिलाईडरोड आणि भायखळा विभागात प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाहने रस्त्यात कुठेही पार्क केल्यामुळे या वाहतूक कोंडीत वाढ झालेली आहे.

गणेशोत्सवात गिरणगावातील लालबागचा राजा, चिंतामणी, तेजुकायाचा राजा, गणेशगल्लीचा राजा, महागणपती अशा प्रसिद्ध गणरायाच्या दर्शनासाठी मुंबईसह, देशभरातून गणेशभक्त दर्शनासाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांची गर्दी या विभागात होते. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणच्या गर्दीत प्रचंड वाढ होते. त्यामुळे रस्त्यांवर वाहने चालविणे देखील अवघड होते. त्यातच हे गणेशभक्त रस्त्यात कुठेही उभे राहत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. गणेशभक्त मुंबई बाहेरून आलेले असल्याने माहिती नसल्याने मिळेल त्या जागी वाहने उभी करतात त्यातच विभागातील रस्ते छोटे असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ होताना दिसते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शनिवारी लालबागचा राजा, चिंतामणी, तेजुकायाचा राजा, गणेशगल्लीचा राजा, महागणपतीला पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांची गर्दी उसळली. आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठीचे मार्ग न समजल्याने काळाचौकी विभागात गर्दी निर्माण झाली. त्यातच वाहनातून येणारे भाविक देखील थांबत असल्याने वाहतूक पोलीस रात्री दोन ते अडीज वाजेपर्यंत वाहतूक कोंडी सोडविण्याच्या कामात लागले होते. वाहतूक पोलीस सांगूनही लोक रस्त्यात वाहने थांबवीत होती त्यामुळे अखेर वाहने उचलण्यासाठी टोइंग व्हॅन आणण्याखेरीज वाहातूक पोलिसांकडे मार्ग उरला नाही. अशीच परिस्थिती भारतमाता सिग्नल जवळ दिसून आली. त्यामुळे हा मार्ग काहीकाळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला

शनिवारी रात्रीपासून शुक्रवार पर्यंत बंद केलेले मार्ग :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ . बी. ए रोड -भारतामाता जंक्शन ते बावला कॉम्पाउंड (डिके रोड जंक्शन )

डॉ . एस . एस .राव रोड / गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकीपर्यत

दत्ताराम लाड मार्ग श्रावण यशवंते चौक ते सरदार हॉटपर्यंत

साने गुरुजी मार्ग संत जगनाडे चौक / गस कंपनी नाक्यापासून ते आर्थर रोड नाक्यापर्यंत

गणेशनगर लेन चिवडा गल्ली / पूजा हॉटेल ते बीए रोडपर्यंत

दिनशा पेटीट लेन /चव्हाण मसाला ते बीए रोड पर्यंत

टिबी कदम मार्ग /व्होल्टास कंपनी ते उडीपी हॉटेलपर्यंत

-बॅरिस्टर नाथ पै मार्ग/ उत्तर वाहिनी ते श्रावण यशवंते चौक

पार्किंग साठी पैसे उकळणे सुरु :

श्रावण यशवंते चौकात आसपासच्या विभागातील काही नागरिक आपली जागा असल्याप्रमाणे रस्त्यात वाहने उभी करण्यासाठी वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांकडून दादागिरी करून पैसे उकळत आहेत. पोलीस लालबाग मध्ये भक्तांना दर्शसाठी मदत करत आहेत. पोलीस आपल्या कामात व्यस्त असल्याने हे लोक गैरफायदा घेत असल्याचे तेथील स्थानिक नागरिक सांगत आहेत.

हे देखील वाचा : 

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे पालघरच्या चारोटी जवळ अपघाती निधन

गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले

 

 

Comments are closed.