Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ दोन पुरस्कार गडचिरोली पोलीस दलास जाहिर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

  • ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ पुरस्कार जाहीर होण्याची ही पहीलीच वेळ आहे.
  • दोन पुरस्कारांचा समावेश..
   १) (Best Unit in use of technology for policing)
   २) (Best Unit in community policing initiatives) 

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असुन, जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलात अतिशय खडतर सेवा बजावत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी हाताळावी लागत असते.  जिल्ह्यातील नक्षल हालचालींवर अंकुश मिळवत उत्कृष्ठ कामगिरी गडचिरोली पोलीस दलाकडून पार पाडल्या जात आहे. हे पुरस्कार जाहिर झाल्यानंतर सर्व गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन  होत आहे .

मा. अंकित गोयल पोलीस अधीक्षक गडचिरोली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली दि,१७ सप्टेंबर : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी आणि वाढविणे, तसेच दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याच प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पोलीसांच्या वतीने “सर्वोत्कृष्ट पोलीस घटक निवड ” ( Best police Unit ) पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते.

या करीता राज्यातील सर्व पोलीस घटकांकडून करण्यात आलेल्या कामगिरीच्या मुल्यांकन करून प्रत्येक घटकातील पुर्ण वर्षात (जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020) या कालावधीमध्ये दाखल गुन्ह्यांची माहिती विचारात घेवुन राज्यातील पोलीस घटकांची तीन श्रेणीमध्ये विभागणी केलेली होती.

यामध्ये गडचिरोली पोलीस दलास कॅटेगिरी ‘A’ गटात मा. अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य, मुंबई. यांचे कडून ‘ सर्वोत्कृष्ट पोलीस घटक ’ निवड झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी गडचिरोली पोलीस दलात अतिशय खडतर सेवा बजावत असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

हे देखील वाचा,

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील महीला शेतकऱ्यांकरीता “ भाजीपाला लागवड ” प्रशिक्षण मेळावा आयोजित

पुन्हा..वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करुण केले गंभीर जखमी; तर दुसरीकडे बैलावर हल्ला करुण केले ठार

 

Comments are closed.