Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी: भारत आणि चीनचं एक पाऊल मागे, लडाख सीमेवरील पँगाँग त्सो लेकवरुन सैन्य मागे हटण्यास सुरुवात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १० फेब्रुवारी: भारत आणि चीन सैन्याच्या जवानांनी पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तरेकडेल किनाऱ्यावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सैन्याने आज (10 फेब्रुवारी) घोषणा केली. या ठिकाणी दोन्ही बाजूकडील जवान अनेक महिन्यांपासून एकमेकांसमोर उभे ठाकले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, 24 जानेवारीला कॉर्प्स कमांडर स्तरातवरील चर्चेदरम्यान सहमती झाल्यावर सैनिकांना मागे घेण्याची सुरुवात झाली आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वु क्यान यांनी लेखी वक्तव्य जारी करताना म्हटलं की, चीन आणि भारताच्या फ्रंट लाईनवरील सैनिकांनी उत्तर आणि दक्षिण पँगाँग त्सो तलावावरुन मागे येण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि चीन यांच्यात चर्चेच्या नवव्या फेरीत सहमती झाल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तर दुसरीकडे भारतीय सैन्याच्या सूत्रांच्या माहितीनुसार पँगाँग त्सोसह प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या काही परिसरातून सैनिकांना मागे घेण्याबाबत सहमती झाली आणि त्यानंतर सैन्य मागे घेण्याचं कार्य सुरु करण्यात आलं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान मागील वर्षी 5 मे रोजी लडाखच्या पँगाँग त्सो खोऱ्यात भारत आणि चीनमधील सैन्यामधील झटापटीनंतर प्रत्यक्ष सीमा रेषेवर तणावाचं वातावरण कायम आहे. यानंरत 15 जून रोजी गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झटापट ही अनेक दशकांनंतर पाहायला मिळाली. या घटनेत दोन्ही बाजूकडचं मोठं नुकसान झालं होतं. गलवान खोऱ्यातील झटापटीत भारताचे 20 जवान शहीद झाले होते. तर चीनचे 40 पेक्षा जास्त जवान मृत्युमुखी पडले होते. मात्र चीने आपल्या मृत जवानांचा अधिकृत आकडा कधीही जगासमोर सांगितला नाही.

यानंतर तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये सैन्य तसंच कूटनिती स्तरावर सातत्याने चर्चा सुरु होती. त्यातच चीनने सुमारे 60 हजार जवानांसह मोठ्या संख्येंने लढाऊ विमानं आणि शस्त्र सीमेवर ठेवली होती. याच्या उत्तरादाखल भारताकडूनही तेवढ्याच संख्येने सैनिक, लढाऊ विमानं आणि शस्त्र तैनात करण्यात आली होती.

Comments are closed.