Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दारुची तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्राशन?, यवतमाळमध्ये 6 मृत्युमुखी

Get real time updates directly on you device, subscribe now.

यवळमाळच्या वणीमध्ये घडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

यवतमाळ डेस्क 24 एप्रिल :सॅनिटायझर प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यवळमाळच्या वणीमध्ये घडली आहे. लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद असल्याने, तल्लफ भागवण्यासाठी सॅनिटायझर प्यायले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. दरम्यान या पाच जणांचा मृत्यू सॅनिटायझर पिऊन झाल्याच्या वृत्ताला वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनीही दुजोरा दिला आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी मृतांची नावं आहेत. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वणी शहरातील तेली फैलमधील दत्ता लांजेवार (वय 47 वर्षे) यांनी काल (23 एप्रिल) रात्री नऊ सुमारास सॅनिटायझर प्यायले आणि नंतर घरी आल्यावर रात्री दहा वाजता त्याच्या छातीत त्रास होण्यास सुरुवाल झाली. त्यानंतर असह्य वेदना होत असल्याने त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु रात्री अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

तसंच नुतन पाथरटकर (वय 33 वर्षे) याचाही सॅनिटायझर पिऊन मृत्यू झाला. काल रात्री तो सॅनिटायझर प्यायला आणि नंतर त्रास होऊ लागल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तिथून तो घरी निघून आला आणि पहाटे त्याचा मृत्यू झाला. याशिवाय वणीच्या एकतानगर इथल्या संतोष मेहर सुद्धा सॅनिटायझर प्यायला आणि पहाटे 3.30 वाजता घरीच मृत्यू झाला. एकतानगरजवळ ढकल ठेला चालवून उदरनिर्वाह करणारा गणेश पाथरटकर याचाही रात्री सॅनिटायझर प्यायल्याने घरीच मृत्यू झाला आहे. तर सुनील ढेंगळे नावाच्या व्यक्तीनेही सॅनिटायझर पिऊन जीव गमावला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.