Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर दि. 28 जुलै :- आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या नृत्य स्पर्धेला सर्व नागरिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.