Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

किसनेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,18 जानेवारी:- मौजा- किसनेली जंगल परिसरात,पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत पोलीस मदत केंद्र गॅरापत्ती, ता. धानोरा, जिल्हा-गडचिरोली येथे दिनांक 18 ऑक्टोंबर 2020 रोजी पोलीस -नक्षलवाद्यांत चकमक झाली. त्या चकमकी दरम्यान एक पुरुष व चार महिलांचा मृतदेह सापडल्याचे आढळून आल्याने सदर घटनेतील मृत पावलेल्या महिलांचे /मृतदेहाचे मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने सदर प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये दंडाधिकारीय चौकशी करावयाची आहे.

घटनेचे आपण पाहिल्या प्रमाणे वर्णन, आपला या घटने विषयीचा अनुभव, घटने नंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्याविषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी आपले म्हणणे, या घटनेशी संबंधीत इतर कोणतीही माहिती त्याअनुषंगाने अनोळखी मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया, उप विभागीय दंडाधिकारी, गडचिरोली हयांचे न्यायालयात सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे/ प्रतिज्ञालेख / साक्ष-पुरावा, सादर करावयाचे आहे त्यांनी 15 दिवसांचे आत किंवा दिनांक 28 जानेवारी 2021 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांचे कार्यालयात, कार्यालयीन वेळेत सादर करावीत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गडचिरोली आशिष येरेकर यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.