Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

धर्मराव कृषी विद्यालयात सायकलींचे वाटप

विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करून मानले आभार!

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : येथील धर्मराव कृषी विद्यालयात सोमवार ३१ मे रोजी मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले.

dkv aheri distribution of bicycle2

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे व मुख्याध्यापक धीरज महंत यांच्या शुभहस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने शालेय व्यवस्थापन विकास समितीचे सदस्य बोण्दयालु ईदुलवार, पर्यवेक्षिका शशिकला सिलमवार, शफीक शेख, प्रवीण बुराण, जयश्री खोंडे, मुकेश गोंगले, गुप्ता, सिडाम आदी शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धीरज महंत म्हणले की, सायकलींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना नियमित शाळेत ये-जा करण्यासाठी योग्य सोयीचे होणार असून एकप्रकारे व्यायाम व प्रदूषणाला आळाही बसू शकतो. शिक्षणासबंधी महत्व पटवून प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्तम व दर्जेदार शिक्षण घेण्याचेही यावेळी आवाहन केले.

सायकली प्राप्त विद्यार्थिनींनी आनंद व्यक्त करून शासन, मुख्याध्यापक व शिक्षकांचे आभार व्यक्त  मानले.

हे देखील वाचा :

धक्कादायक!! आलापल्लीत राहत्या घरी महिलेचा आढळून आला मृतदेह!

गडचिरोली जिल्ह्यात आज 170 कोरोनामुक्त, एका मृत्यूसह 33 नवीन कोरोना बाधित

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.