Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य गोंडवाना विद्यापीठात ऑनलाइन विशेष व्याख्यान

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, 5 मार्च 2022 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य 8 मार्च 2022 रोजी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीतील पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने विशेष ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या विशेष व्याख्यानात डॉ.मनप्रीत कौर, विभाग प्रमुख, हिंदी विभाग, गुरुनानक कॉलेज, मुंबई ‘शाश्वत उद्यासाठी आजपासून स्त्री पुरुष समानता’ या विषयावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे असतील. कार्यक्रमाला डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि डॉ. अनिल चिताडे, कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ.रजनी वाढई, सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी सांगितले की विविध क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती अजून वाढावी व महिला अजून सक्षम व्हाव्यात या प्रबळ भावनेने जगभरात महिला दिन साजरा केला जातो. याच धर्तीवर पदव्युत्तर शैक्षणिक विभाग,गोंडवाना विद्यापीठ ,गडचिरोली दरवर्षी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच समाजात स्त्री पुरुष समानता निर्माण होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे या हेतूने त्यांना आमंत्रित करत असते.

हा कार्यक्रम सर्व क्षेत्रातील महिला,पुरुष तसेच विद्यार्थी या सर्वांसाठी आभासी पध्दतीने मायक्रोसॉफ्ट टीम द्वारे 8 मार्च 2022 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमामध्ये सह्भागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अर्ज भरने आवश्यक आहे. कार्यक्रमाची नोंदणी लिंक तसेच क्यू आर कोड विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिलेला आहे तसेच अधिक माहितीसाठी कार्यक्रमाचा व्हाट्सएप ग्रुप देखिल बनविण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. अनिल चिताडे, प्रभारी कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केले आहे.
नोंदणी करण्यासाठी लिंक आहे.
https://forms.office.com/r/3vNRSpUcZH

हे देखील वाचा : 

चक्क, त्या तीन बहिणींनी नवराच केला एकमेकांत शेयर..

युक्रेनमधल्या नागरिकांसाठी रशियाचा मोठा निर्णय, 6 तासांसाठी युद्धविराम घोषित

“मेट्रोच्या अर्धवट कामाच्या उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील विद्यार्थ्यांना परत आणा” शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.