Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय पथकाने साधला देऊळगाव येथील शेतकऱ्यांशी सवांद

दुसऱ्यांदा केंद्रीय पथकाकडून नैसर्गिक आपत्तीचे नुकसान भरपाई शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना पुन्हा मदत मिळण्याचे दिले आश्वासन   

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २४ डिसेंबर: आरमोरी तालुक्यात ऑगस्ट महिन्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने केंद्रीय पथक आज दुसऱ्यांदा पिकाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर दुपारी आरमोरी गडचिरोली मार्गावरील देऊळगाव जवळील रोडलगत असलेल्या शेताची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला.  

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

केंद्रीय पथकाने साधला शेतकऱ्यांशी सवांद

केंद्रीय पथकाकडून जवळपास दहा पंधरा मिनिटाच्या भेटीत खोब्रागडी नदीलगत असलेल्या शेताची रोडवरूनच पाहणी केली. यावेळी त्यांनी देऊळगाव येथिल शेतकरी प्रकाश ठाकरे व इतर शेतकरी यांच्याशी थेट संवाद साधला. आगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने धान पीक बुडाले. त्यामुळे मोठे नुकसान झाले. शासनाकडून भरीव मदत मिळाली नाही अशी आपबित्तीही यावेळी शेतकऱ्यांनी पथकासमोर मांडून शासनाकडून कशी तोकडी मदत मिळाली हेही सांगण्यासाठी बँकेचे पासबुकही त्यांनी पथकाच्या अधिकाऱ्यांना दाखविले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महापुराने आगस्ट महिन्यात धान पीक बुडाले तर त्याची कापणी केली काय? असा प्रश्नही पथकाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विचारले असता नोव्हेंबरमध्ये कापणी केली असे उत्तर एका शेतकऱ्यांनी दिले  तेंव्हा आगस्ट मध्ये धान बुडल्यानंतर नोव्हेंबर मध्ये कापणी कशी केली असा  प्रतीप्रश्नही पथकाच्या अधिकाऱ्यांनी केला. तेव्हा धान पीक गेले परंतु जनावरांना चारा व्हावा यासाठी नोव्हेंबर महिन्यात कापणी केल्याची माहिती शेतकऱ्यांनी पथकाला दिली.मागील वर्षी किती धानाचे उत्पादन झाले व यावर्षी किती उत्पादन झाले. असा प्रश्नही पथकाच्या अधिकाऱ्यांनी विचारला असता मागील वर्षी सव्वा एकराचे पंचवीस पोते झाले तर यावर्षी दोन तीन पोतेही धान झाले नाही असे ही शेतकऱ्यांनी सांगितले.

साहेब, आम्हाला भरीव मदत द्याहो! आमचे हिरवंगार स्वप्न ही पुराच्या पाण्यात वाहून गेले हो. अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर लाऊन धरली असता पुन्हा तुम्हाला मदत मिळेल असा आशावाद आश्वाशन पथकाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिले. यावेळी केंद्रीय पथकाच्या अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी दीपक शिंगला. उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम तहसीलदार कल्याणकुमार डहाट सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.