Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

प्रभु रामचंद्राच्या भव्य व दिव्य अश्या मंदिरासाठी सामान्य जनतेचा भावनिक सहभाग महत्त्वाचा: सिपेली येथील आत्राम महाराज यांचे प्रतिपादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

अहेरी येथे रामजन्मभूमी निधी समर्पण अभियानाचा कार्यालयाचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. १५ जानेवारी : प्रभू श्रीरामचंद्र हे भारतीय समाजजीवनाचे आदर्श आहेत. मर्यादा पुरुषोत्तम अशी त्यांना उपमा दिली जाते. त्यांनी आपल्या जीवनकाळात संघर्षकरून आदर्श प्रस्थापित केला आहे. प्रभू श्रीरामानी 14 वर्षाच्या वनवास काळात प्रारंभी आदिवासी जनजाती लोकांना भेटून वनवास काळात प्रवेश केला होता. त्यामुळे प्रभू रामचंद्रानी आपल्या जीवनकाळात जसा संघर्ष केला होता तसा कित्येक वर्षाचा संघर्ष करून रामजन्मभूमी वर आता भव्य व दिव्य असे आराध्य प्रभूरामाचे मंदिर उभे राहत आहे. त्यासाठी श्रीरामांच्या मंदिरा करिता सामान्य जनतेचा भावनिक सहभाग असावा या उद्देशाने न्यासा तर्फे घरोघरी संपर्क करून निधी समर्पणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याला सर्वानी हातभार लावावा असे आवाहन तेलंगणा सिपेली येथील आत्राम महाराज यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अहेरी येथील निधी समर्पण कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते नारळ फोडून व श्रीरामदरबाराची विधिवत पूजा करून या कार्यालयाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी दत्ताजी केळकर, प्रांत सह अभियान प्रमुख म्हणाले, रामजन्मभूमी सोप्या मार्गाने मिळाली नाही त्यासाठी अनेक शतके प्रतीक्षा करावी लागली आता प्रत्येकांचा मनात राम मंदिर उभे करायचे आहे, त्याकरिता राम मंदिर निधी समर्पण अभियान राबविण्यात येत आहे. यात उद्धाटन प्रसंगी संतोष जोशी, अभय भोयर, संजय आझाद यांनी चेक च्या स्वरूपात निधी समर्पण केले.

श्रीराम मंदिर मनात बसवावे लागेल. रामाने आपल्या वनवासात कधी राज्य केले नाही दुसरांना जिंकण्यात मदत केली या अभियानात सर्व जन न्यासाचे कार्यकर्ते आहेत.कन्याकुमारी विवेकानंद स्मारकासाठी आपण सव्वा रुपये घेऊन अभियान यशस्वी केले होतेय तसे हे निधी समर्पण अभियान प्रत्येक गाव व घरा प्रयत्न पोहचवले जाणार आहे. आपल्या जीवनात रामजन्मभूमी करीत योगदानाबद्दल जीवनभर आठवणी राहणार आहे.

यावेळी आत्राम महाराज यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा संघचालक गजाननराव राऊलवार,प्रांत कार्यवाह, दिपकजी तामशेट्टीवार, पराग दवंडे विभाग संयोजक वि ही प, सिताराम सोनोनिया अध्यक्ष वि ही प, अमित बेझलवार अभियान प्रमुख, संतोष जोशी अभियान सहप्रमुख, सुरेश गड्डमवार जिल्हा कोष प्रमुख,राजू गग्गुरी जिल्हा कार्यालय प्रमुख, भारत कोहपरे जिल्हा टोळी सदस्य, सचिन ऐरोजवार नगर अभियान प्रमुख, अश्विन जयपूरकर, जयप्रकाश शेंडे आदी सह युवा वर्ग व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.