Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

३,५०० रुपयाची लाच स्वीकारतांना पोलीस हवालदारास रंगेहाथ अटक

 गडचिरोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३ डिसेंबर : पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस हवालदार शकील सय्यद यांना ३ हजार ५०० रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडुन  गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत आज दि. ३ डिसेंबर रोजी अटक केली आहे. 

मिळालेल्या माहिनुसार, तक्रारदाराच्या आतेभावास गुन्ह्यात अटक करून जेलमध्ये न पाठविण्याचे व त्यांस जमानत देण्याकरिता पोलीस हवालदार शकील सय्यद यांनी ३,५००/- रुपयाची मागणी केली होती. माञ तक्रारदारास पैसे देणे इच्छा नसल्याने सदर तक्रारदाराने हि तक्रार गडचिरोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास कक्षामध्ये पोलीस हवालदार शकील सय्यद यांना ३,५००/- रुपयाची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक केले असून यांच्यावर गडचिरोली, कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ या कलमान्व्ये गडचिरोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कारवाईसाठी गडचिरोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुरेंद्र गरड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सहाय्यक फौजदार प्रमोद ढोरे, नापोशी राजू पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोलीस शिपाई किशोर ठाकूर, संदीप उडान, संदीप घोरमोडे, महिला पोलीस शिपाई विद्या म्ह्शाखेत्री व चापोहवा तुळशीराम नवघरे आदींनी  मोठ्या शिताफीने हि कारवाई पार पाडली. 

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धारावी पोलिस ठाणे ने सोन साखळी चोरी करणाऱ्या आरोपी ना केले अटक

लग्न स्वागत सोहळ्यात अन्नातून २०० जणांना विषबाधा

 

Comments are closed.