Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लिंबुच्या पानांचे आहेत एवढे विलक्षण फायदे की तुम्ही कधी विचार सुद्धा केला नसणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

Health tips :- खरतर लिंबाच्या पानांचा आपण वर्षभर उपयोग करू शकतो व त्याचा फायदा घेऊ शकतो. आजच्या आमच्या या माहितीद्वारे आम्ही तुम्हाला या पानांचे खास फायदे सांगणार आहोत जे खूपच औषधी आहेत. हजारो वर्षांपासून याचा प्रयोग केला जात आहे. अनेक आजारांना याच्या मदतीने आपण दूर ठेवू शकतो. आयुर्वेदात याचे खूपच महत्व आहे.

आज आपण लिंबाच्या पानांचे फायदे बघूया. तुमच्या जवळपास ही पाने मिळू शकतात. तुम्ही याचा प्रयोग करू शकतात. आयुर्वेदात माहिती महत्वाची आहे, योग्य प्रमाण खूप महत्वाचे आहे. तरच त्याचा फायदा मिळतो. याच्याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

◼️महत्त्वाचे म्हणजे लिंबाचे पान जर हातात घेऊन ते चुरुन किंवा रगडून त्याचा वास घेतला, तर डोकेदुखीमध्ये आराम पडतो. कोणाला डोकेदुखी, अर्धशिशी, मायग्रेन असेल तर लिंबाच्या पानाचा प्रयोग करून तुम्ही ठीक होऊ शकता. याची पाने हातात रगडून ५ मिनिटे श्वास घ्या, तुम्हाला आराम मिळेल.

◼️ही पाने तुमच्या चेहर्‍यावरील डाग, खड्डे, मुरूमे दूर करण्यासाठी फायदेमंद आहेत. ही खूपच दिव्य अशी औषधी आहे. याची पाने घ्या, छोटी ५ ते ६ पाने घ्या, ती वाटून घ्या व त्यात मध मिसळून चेहर्‍यावर लावा. दिवसातून एकदा हा प्रयोग करून बघा, चेहर्‍यावरील सुरकुत्या, डाग, मुरूमे दूर होतील व चेहरा चमकदार होईल.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

◼️लिंबाच्या पानांचे खूप फायदे आहेत.कोणाला त्वचारोग असेल, खाज, खरूज, नायटा, फोड असेल, तर ते दूर करण्यासाठी लिंबाची पाने खूपच उत्तम असे औषध आहे. त्या साठी एक साधा प्रयोग करून बघा. पाने वाटून त्याची पेस्ट बनवा, त्यात थोडा कापुर व कडुनिंबाचे तेल मिसळा. एक चिमुट हळद घाला. सगळे व्यवस्थित मिसळा व जिथे तुम्हाला खाज, खरूज, नायटा असेल त्याजागी ही पेस्ट लावा. कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात ह्याचा लेप खूपच फायदेशीर आहे. त्वचारोग नाहीसा होतो, खूपच दिव्य औषध आहे हे.

◼️केसांमधील कोंडा नाहीसा करण्यासाठी पण याचा उपयोग होतो. पाने वाटून पेस्ट बनवून केसांच्या मुळाशी लावून हलक्या हाताने मालीश करा. १ ते २ वेळा लावल्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो.
पोटात जंत झाले असतील, साधारण लहान मुलांच्या बाबतीत जर पोटात जंत झाले, तर लिंबाच्या पानांचा ५ मिली रस घेऊन त्यात हलका मध घालून मुलाला पाजा, त्याच्या पोटातील जंत मरतील या रसाने. मोठ्या माणसासाठी १० मिली रस जरूरी आहे.

◼️कावीळ झाली असेल, तर त्यासाठी पानांचा १० मिली रस काढून तो ताकात मिसळून त्याचे सेवन करा. १० ते १२ दिवस हे घेतले तर कावीळ ठीक होते. हा काविळीसाठी रामबाण उपाय आहे.

◼️पोटातील कोणत्याही समस्येवर म्हणजेच गॅस, पोटदुखी, बद्धकोष्टता यावर हा उपाय प्रभावी आहे.

खरंतर सर्वांन माहीत आहे लिंबू खाण्याचे किती फायदे आहेत त्याचप्रमाणे याची पाने सुद्धा खूपच फायदेशीर आहेत. याच्या पानांचा काढा रक्त शुद्ध करतो. पाने घालून चहा बनवून घेऊ शकता.

हे पण वाचा :-

Comments are closed.