Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

शासकीय कामकाजात अडथळा तसेच महिला कर्मचाऱ्यांला अर्वाच्य बोलून अपमानित केल्याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर :  पंचायत समिती आरमोरी येथे कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचाऱ्यांला अर्वाच्य बोलून व अपमानित करून विनयभंग केल्याप्रकरणी व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी विवेक खेवले याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

आरमोरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात कनिष्ठ साहाय्यक पदावर कार्यरत असलेली महिला कर्मचारी कार्यालयीन वेळेत काम करीत असताना पंचायत समिती सदस्य विवेक बलराम खेवले हे कार्यालयात येऊन हयातीचे प्रमाणपत्र मिळाले का अशी विचारणा केली असता महिला कर्मचाऱ्यांने हयातीचे प्रमाणपत्र आले की नाही माहीत नाही. डाकमध्ये आले असेल.असे उत्तर दिले असता पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांनी पीडित महिला कर्मचारी हिच्या जवळ जाऊन तिला खुर्चीवरून जबरजस्तीने उठवायला लावले व खुर्चीला हात लावून ढकलण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

“तू बाहेर निघ, तू कोण आहेस, तुझ्या बापाची पंचायत समिती आहे का,” असे बोलून अपमानित केले व शासकीय कामकाजात अडथळा आणला. अशी तक्रार पीडित महिला कर्मचारीने आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्या विरोधात कलम ३५३,३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी प. स. सदस्याला कोर्टाने तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन

 

 

 

Comments are closed.