Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी. अज्ञात इसमावर गुन्हा दाखल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, दि. २३ नोव्हेंबर : आरमोरी तहसील कार्यालयासमोर असलेल्या वस्तीत गौतम ऋषी निंमगडे (६३) यांच्या राहते घरी अनोळखी इसमाने धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गौतम ऋषी निमगडे हे मृत्यू पावले तर त्यांची पत्नी माया गौतम निमगडे (६०) ही गंभीर जखमी आहे. या घटनेबाबत पोलीस स्टेशन आरमोरी येथे मृतकाचा मुलगा नितीन गौतम निमगडे यांनी तक्रार दाखल केली.

पोलीस स्टेशन आरमोरी  यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मृतक गौतम निमगडे व त्याची पत्नी माया निमगडे आपल्या राहते घरी झोपेत असताना रात्री सुमारे २ ते ३ च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने दरवाज्याची घंटी वाजविली. कोण एवढ्या रात्री आलेत हे बघण्यासाठी गौतम निमगडे यांनी दरवाजा उघडला असता, अज्ञात इसमाने क्षणाचाही विलंब न करता हातात असलेल्या शस्त्राने डोक्यावर सपासप पती-पत्नीवर वार करून पळून गेला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या माया निमगडे यांनी लगेच तळ मजल्यावर राहत असलेल्या मुलाला घटनेची माहिती भ्रमनध्वनीने दिली. लगेच मुलाने आरडा ओरड करीत जखमी अवस्थेत असलेल्या आई वडिलांना उपचारासाठी उप जिल्हा रुग्णालय आरमोरी येथे तातडीने भरती करण्यात आले. मात्र गंभीर मार असल्याने उपचारा दरम्यान गौतम निमगडे यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या माया गौतम निमागडे यांना ब्रम्हपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची तक्रार दाखल झाली असून, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करून पोलीस विभागांनी स्वान पथकास पाचारण करून घटनास्थळावरून फिंगर प्रिंट घेण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहेत. मृतक हे शांत व मन मिळावू स्वभावाचे असल्याने पोलीस विभाग या प्रकरणाची सखोल चौकशी करीत असले तरी अज्ञात आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे.

हे देखील वाचा :

पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

आदिवासी गोवारी समाज बांधवांचे शहीद स्मारकाला अभिवादन

 

 

Comments are closed.