Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण!

‘जय भीम’ची पुनरावृत्ती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयभीम चित्रपटात मांडलेल्या कथेत पोलिस यंत्रणेचे मांडलेले भयाण वास्तवाची प्रचीती वसईत पाहायला मिळाली आहे.

पालघर, दि. २३ नोव्हेंबर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वास्तव करणाऱ्या आदिवासी महिला आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी कामाकरिता आले असता त्या आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

विशेष बाब म्हणजे पोलिसांनी या महिलांना केवळ संशयावरून ताब्यात घेवून त्यांना मारहाण करून सोडून दिले. यांना ताब्यात घेतल्याची कोणतीही नोंद पोलीस दफ्तरी केली नाही.

कासा परिसरात राहणाऱ्या बेबी नारायण वावरे, दीपिका दिनेश वावरे, विमल माणक्या पुंजारा, सोनम सबू भोईर,  सीता संताराम भोईर, तारु सुभाष डोकफोडे मूळ राहणार कावडास कासा आता कामासाठी पापडी तलाव कोळीवाडा या ठिकाणी राहतात. या महिला वसईत बिगारी काम करतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शुक्रवारी या महिला पापडी येथे बाजार भरत असल्याने घरी जाताना बाजारहाट करत असताना काही नागरिकांनी या चोरी करण्यासाठी आल्याचे सांगत पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी त्यांना रिक्षात भरून पापडी चौकीत नेले. येथील सहायक पोलीस निरीक्षक वाघ आणि त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना दंडुक्याने मारहाण करत चोरीचा आड लावला. आणि त्यांना पुन्हा बाजारात न दिसण्याची धमकी दिली.

पिडीत महिलांनी या संदर्भात आदिवासी संघटना यांना माहिती दिल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांना जाब विचारला असता पोलिसांनी केवळ समज देण्यासाठी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा केला आहे. तर वसई विरार महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय तपासणीत महिलांच्या दंडावर मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

उपायुक्तांकडून प्रकरणाच्या चौकशीचे आदेश;

यासंदर्भात माहिती देताना परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी माहिती दिली की, या प्रकरणाचा तपास वसई साहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. तर या महिलांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी श्रमजीवी संघटना, लालबावटा संघटनेने पुढाकार घेतला असून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हे देखील वाचा :

निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

पंचायत समिती सदस्य विवेक खेवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

 

Comments are closed.