Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

वनविकास महामंडळाच्या पोर्ला वनातील घटना .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि,२३ नोव्हेंबर:वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक दोन मध्ये येत असलेल्या जंगलात वाघाने एका महिलेवर हल्ला केल्याने  जागीच  मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू  झालेल्या महिलेचे नाव इंदिरा उद्धव आत्राम (60) असुन चूरचुरा गावातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . सदर घटनेची माहिती वनविकास महामंडळाच्या   वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल कुळमेथे यांना  प्राप्त होताच  आपल्या  वन कर्मचार्यासह घटनेस्थळी दाखल होवून मोका पंचनामा करून गडचिरोली पोलिसाना माहिती देण्यात आली आहे .

वाघाने जंगलात  हल्ला केला त्यावेळी पाच ते सहा महिला व एक पुरुष झाडूसाठी लागणारे  गवत गोळा करीत असताना अचानक  ११;३० च्या दरम्यान वाघाने  हल्ला केला त्यावेळी सोबत असलेले  सर्वच  सैरावैरा पळून गेले मात्र वाघाचा हल्ला जबर असल्याने महिलेचा  जागीच मृत्यू झाला  जंगलात पोलिसांनी हि पंचनामा करून  मृत  महिलेचा शव ताब्यात घेवून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून परिवारांच्या स्वाधीन करण्यात आले आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली आणि वडसा वनविभागात नरभक्षक वाघाने चांगलीच दहशत निर्माण केली असून दोन वर्ष्यात तब्बल १७ लोकांचा बळी गेला  आहे. नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी  गडचिरोलीतील विविध गावातील नागरिक एकत्र येत आंदोलन उभारले होते . वनविभागाचे  कर्मचारी हि वाघाला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात होते मात्र नरभक्षक वाघ गवसला नाही त्यांतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डा किशोर मानकर ,.खा. अशोक नेते यांनी हि घटनेचे गांभीर्य ओळखून राज्य शासन तथा  केंद्रसरकारकडे मुद्दा उपस्थित केला .

त्यांवेळी वरीष्ठाच्या सूचनेनुसार  तातळीने वाघाला जेरबंद करण्याचे आदेश देण्यात आले . त्यावेळी  वन विभागाने जवळपास एक महिना अथक परिश्रम करून वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे विविध पथक जंगलामध्ये दाखल झाले मात्र त्याच दरम्यान नरभक्षक वाघाचे दर्शन झाले नसल्याने आलेल्या वनपथकाला परत जावे लागले, त्यानंतर तब्बल अडीच महिन्यानंतर चुरचूरा  येथील महिला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या झाडूचे गवत वनविकास महामंडळाच्या  पोर्ला वनपरिक्षेत्रातील  कक्ष क्रमाक २ मध्ये जवळपास  जंगलात २ किमी आत झाड़ूसाठी गवत गोळा करीत असताना वाघाने अचानक हल्ला केल्याने  जागीच मृत्यू झाली  असल्याने पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वन विभाग नागरिकांत  जनजागृती करून  जंगलात जाण्यासाठी करीत आहे मज्जाव!

वाघाच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे गडचिरोली आणि वडसा  वनविभागाने गावात जनजागृति करुण नागरिकांना जंगलात जाण्यास मज्जाव केला आहे  व  गाव पातळीवर युवकांची फळी निर्माण करून वनाचे रक्षणासह वन्य जीवाचे रक्षण व्हावे. यासाठी जनजागृती केली होती . अतिशय महत्त्वाचे काम असल्यास दोन चार लोक एकत्र जंगलात जावे अशी वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. जंगलात वाघाचे वास्तव्य आहे हे माहीत असूनही आज पुन्हा जंगलात  गेल्याने  वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याने नरभक्षक वाघाचा मुद्दा  पुन्हा ऐरणीवर आला आहे..

हे  देखील वाचा,

आदिवासी गोवारी समाज बांधवांचा शहीद स्मारकाला अभिवादन!

…आजही वन्यजीवाकरीता कायम वन्यजीव चिकित्सक नाही; वन प्रशासनाचे अजब धोरण…

 

Comments are closed.