Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यस्तरीय अवैधरीत्या ऑनलाईन जुगाराचे सक्रिय रॅकेट केले उघड,१० आरोपींना अटक गडचिरोली पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली दि ३१ जुलै : मोबाईल अँप्प च्या माध्यमातून गडचिरोली जिल्हातील अहेरी आलापल्ली आष्टी व चन्द्रपूर जिल्हयात क्रिकेट फुटबाल व इतर खेळात ऑनलाईन जुगाराच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात गडचिरोली पोलिसांना यश प्राप्त झाले असून या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून १० आरोपींना अटक करण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी हे अहेरी,आलापल्ली ,आष्टी व चन्द्रपूर येथील असून त्यांच्या कडून जुगारात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल ३० जुलै २०२१ रोजी गडचिरोली पोलीस दलाने कारवाई करत आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी,मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुडप्पवार, चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार यांच्याविरूद येथे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दि.३० जुलै २०२१ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर व त्यांच्या टिमने आष्टी परिसरातील छगन मठले, राजू धर्माडी,मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदप्पवार यांना चौकशी करीत बोलवले व चौकशी दरम्यान हे Betx 1.co आणि nice.7777.net या बेकायदेशिर ऑनलाईन जुगार प्लॅटफार्मच्या माध्यमातून क्रिकेट, फुटबॉल आणि इतर बाबी संबंधी बुकी म्हणून काम करत असल्याचे निष्पन्न झाले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरोपी कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर येथील राकेश कोंडवार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार हे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयामध्ये बेकायदेशिर ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे मुख्य वितरक असून ते युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट/क्लायंट तयार करत असल्याची माहिती समोर आली असता सर्व आरोपीं विरूध्द पोलीस ठाणे अहेरी येथे भा.द.वि कलम ४२०,४६५,४६८,४७१ सह कलम जुगार अधिनियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

तसेच सदर नमुद आरोपींकडून ऑनलाईन जुगाराकरिता वापरण्यात येणारे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.सदर ऑनलाईन जुगाराचे मोठे राज्यस्तरीय रॉकेट कार्यरत असल्याचे दिसून येत असून त्याअनुषंगाने पोलीस अधिक तपास करीत आहेत.सदर कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, नापोशि मनोज कुनघाडकर, पोशि विश्वनाथ उडाण, पोशि वडजु दहीफळे, नापोशि श्रीकांत भांडे, नापोशि नितीन पाल, पोशि सुरज करपते, पोशि उध्दव पवार, पोशि बेगलाजी दुर्गे यांनी केली.

हे देखील वाचा,

…अन..घरात दडून बसलेल्या अस्वलला वन विभागाने जंगलात लावले पळवून

विधिमंडळाच्या ५५ वर्ष कामकाजाचा ‘एकमेव’ साक्षीदार हरपला!

Comments are closed.