Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत ‘भव्य महारोजगार व स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न

गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ च्या माध्यमातून, प्रथम एजूकेशन फाउंडेशन, बीओआय स्टारआरसेटी, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य 'महा रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे' आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले होते.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ३० डिसेंबर : गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल असून जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची संधी पाहिजे त्या दृष्टीने नगण्य आहे. येथील युवक युवती मध्ये मेहनत करण्याची जिद्द व कार्यतत्परता असूनही ती संधी मिळत नसल्याने तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून गरजू युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज दिनांक ३० डिसेंबर २०२१ रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन राळेगाव, औरंगाबाद, अहमदनगर यांच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, वेल्डिंग, जनरल ड्युटी मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती प्रमाणपत्र तसेच बीओआय स्टार आरसेटी च्या माध्यमातून पापड, लोणचे, टू व्हीलर फोर व्हीलर दुरुस्ती, फास्टफूड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०१ युवक-युवतींना स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता कीट देण्यात आली. त्याचप्रमाणे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन केंद्र आत्मा यांच्यामार्फत ९५ युवक-युवतींना पालेभाज्या लागवड प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी भव्य महा रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य धाम येथे करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरू असलेल्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना ब्युटी पार्लर  – ७०, मत्स्यपालन – ६०, कुकूटपालन – २९३, फोटोग्राफी – ३५, मधुमक्षिकापालन – ३२, व शेळीपालन – ६७, पालेभाज्या लागवड – ११४, टू व्हीलर व फोर व्हीलर २३५, अशा एकूण ९४१ बेरोजगार युवक युवतींना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगारासाठी आत्मनिर्भर केले आहे. तसेच हॉस्पिटॅलिटी २५४ ऑटोमोबाईल प्रशिक्षण १९७, इलेक्ट्रिशियन ११५, प्लंबिंग ११, वेल्डिंग – १८, सुरक्षारक्षक – ४१३, नर्सिंग असिस्टंट – ११४३, ॲक्सिस बँक गडचिरोली यांचे माध्यमातून फिल्ड ऑफिसर – ११ असे एकूण २१५४ ग्रामीण गरीब व गरजू युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कार्यक्रमाप्रसंगी निवड झालेल्या उमेदवारांचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, सन २०२१ या वर्षाच्या सुरुवातीपासून ‘पोलीस दादालोरा खिडकीच्या’ माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. तसेच हजारो युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी मिळवून दिल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित उमेदवारांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे. आपले आप्तस्वकीय व मित्र यांना देखील रोजगाराच्या बाबतीत अवगत करून त्यांनी देखील गडचिरोली पोलीस दलाने उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराच्या संधी चा लाभ घ्यावा व आपल्या कुटुंबाचे राहणीमान उंचवावे असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी अपर अधीक्षक प्रशांत समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कार्यक्रम समन्वयक तथा प्रकल्प संचालक के. व्ही. के. आत्मा गडचिरोली संदीप कराडे (एल.डी.एम.),  बी.ओ.आय. युवराज टेंभूर्णे गडचिरोली हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे/उपपोस्टे/पोमके तसेच नागरिक कृती शाखेचे प्रभारी अधिकारी  महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

हे देखील वाचा  : 

Big Breaking : वाघाची शिकार करून पुरले जमिनीत

महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक

अबब!! आता न्यायाधीशच्या जागी मशीन लावणार निकाल!

 

Comments are closed.