Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नवीन 224 कोरोना बाधित तर 99 कोरोनामुक्त

गडचिरोली जिल्हात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. 20 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 1022 कोरोना तपासण्यांपैकी 224 नवीन कोरोना बाधित आढळले असून 99 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 32371 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 30664 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 956 झाली आहे.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 751 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.73 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.95 टक्के तर मृत्यू दर 2.32 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 117, अहेरी तालुक्यातील 10,आरमोरी तालुक्यातील 09, भामरागड तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 23, धानोरा तालुक्यातील 18, एटापल्ली तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 09,सिरोंचा तालुक्यातील 02, आणि वडसा तालुक्यातील 17 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 99 रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 62, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 05, भामरागड तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 05, एटापल्ली तालुक्यातील 01, सिरोंचा तालुक्यातील 01, कोरची तालुक्यातील 02,मुलचेरा तालुक्यातील 06, कुरखेडा तालुक्यातील 01,आणि वडसा तालुक्यातील 10 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली जिल्ह्यात ९ नगरपंचायतीं पैकी सिरोंचात आविसं,कुरखेड्यात भाजपची एक हाती सत्ता तर अहेरीत त्रिशंकू

 

 

Comments are closed.